Mushtaq Khan Kidnapped: कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) यांच्यानंतर आता अभिनेता मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांचंही अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एका कार्यक्रमाचं नाव सांगून मला बोलावण्यात  आलं आणि त्यांचं अपहरण झालं असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी केला आहे. तसेच अपहरण करणाऱ्या टोळीने मुश्ताक यांची सुटका करण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणीही गोळा केला असल्याचं त्यांनी सांगितलं. 


इंडिया टुडे डिजिटलशी बोलताना त्यांचे पार्टनर शिवम यादव म्हणाले की, मुश्ताकला 20 नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये एका अवॉर्ड शोसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी त्याला आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. यानंतर त्यांना विमानाचे तिकीटही पाठवण्यात आले. दिल्लीत उतरल्यावर त्याला कारमध्ये बसवून दिल्लीच्या बाहेरील बिजनौरजवळ कुठेतरी नेण्यात आले.


मुश्ताक खानकडून 2 लाखांहून अधिक खंडणी वसूल


शिवमने पुढे सांगितले की, अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खानला सुमारे 12 तास कैद केले. त्याच्याकडून खंडणी म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक आणि त्याच्या मुलाच्या बँक खात्यातून दोन लाखांहून अधिक रुपये काढले. जेव्हा अभिनेत्याने सकाळच्या अजानचा आवाज ऐकला तेव्हा त्याला समजले की जवळच एक मशीद आहे. अशा स्थितीत तो तेथून निसटला आणि पोलिसांच्या मदतीने घरी परतला.                                         


बिजनौरमध्ये एफआयआर दाखल


'मुश्ताक आणि त्याचे कुटुंब त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने हादरले होते. मात्र, स्वत:ला शांत करून एफआयआर दाखल केली आहे.  मी स्वत: बिजनौरला जाऊन अधिकृत एफआयआर दाखल केला. आमच्याकडे विमानाची तिकिटे, बँक खाती आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आहे, अगदी त्याला जिथे ठेवले होते ते घरही अशी सगळी ओळखही तो करु शकतो.'                                






ही बातमी वाचा : 


Pushpa 2 Box Office Collection Day 6: 'स्त्री 2'लाही पछाडलं, सहव्या दिवशी 600 कोटींच्या क्लबमध्ये 'पुष्पा 2' ची एन्ट्री!