Crime News : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरमध्ये एका इंजिनिअरने पत्नीच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने 24 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. अतुल सुभाष (Atul Subhash) (वय 34) असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. तो बंगळुरुमधील मराठाहल्ली येथील राहिवासी होता. सुसाईड नोट शिवाय या तरुणाने त्याच्या टीशर्टवर एक पानही चिटकवले होते. यावर 'Justice Is Due', असा मजकूर लिहिला होता. senior executive असलेल्या या तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या जाचामुळे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. आत्महत्या केलेला तरुण सुभाष हा मूळचा उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) राहिवासी होता.
याबाबत अधिकची माहिती अशी की, अतुल सुभाष हा गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एका एनजीओजला व्हॉट्सअॅप मेसेज देखील केला होता. महिलांकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबाबत सुभाषने एनजीओकडे भाष्य केले होते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे अतुल सुभाषने तो आत्महत्या करणार असल्याचे एनजीओला देखील सांगितले होते.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरातील भिंतीवर एक प्रिंटआऊट देखील सापडले आहे. यावर Justice is Due, असं लिहिण्यात आलं होतं. एका रिपोर्टनुसार, अतुल सुभाष याच्या पत्नीविरोधात उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये हुंडा, हत्येचा प्रयत्न यासह 9 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अतुल गेल्या काही काही दिवसांपासून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करत होता.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, अतुलने आत्महत्या करण्यापूर्वी चार वर्षीय मुलासाठी गिफ्ट देखील ठेवले होते. 24 पानांच्या सुसाईड नोटमध्ये अतुलने त्याचं केलं जाणारं शोषण, पैशांचा गैरव्यवहार याबाबत भाष्य केलं आहे. याशिवाय त्याने आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी एक व्हिडीओ देखील शूट केला होता. या व्हिडीओमध्ये जौनपूर येथील न्यायालयाचे न्यायमूर्ती, पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियांना आत्महत्येस जबाबदार ठरवले होते. अतुल या नोटमध्ये म्हणाला, माझ्या पत्नी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात 9 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला बंगळुरु आणि उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या