Beast : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजयचा (Thalapathy Vijay)  बीस्ट (Beast) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत. पण आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. जगभरातील चित्रपगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण आता काही देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. 


काही दिवसांपूर्वी बीस्ट चित्रपटावर कुवेतच्या सरकारनं बंदी घातली. रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये मुस्लिम व्यक्तीला दहशतवाद्याच्या भूमिकेत दाखवल्यामुळे कुवेत सरकारनं या चित्रपटावर बंदी घलण्याचा निर्णय घेतला. आता कुवेतनंतर कतार या देशामध्ये देखील या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, कुवेतमध्ये बॅन झाल्यानंतर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर फारसा परिणाम होणार नाही. पण कतारमध्ये बॅन झाल्यानंतर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो.   


चित्रपटामध्ये थलापती विजयबरोबरच पूजा हेगडे, सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 13 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


शहारूख थलापती विजयचा जबरा फॅन


शाहरूखनं ट्वीट शेअर करून लिहिले, 'मी दिग्दर्शक एटलीसोबत बसून बीस्टचा ट्रेलर पाहिला. ते देखील माझ्यासारखेच विजयचे फॅन आहेत. बीस्टच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. हा ट्रेलर मीनर, लीनर आणि स्ट्रॉन्गर दिसत आहे. ' 


हेही वाचा :