Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)

  आणि अभिनेत्री  कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचा 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2)  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या नवा पार्टची म्हणजेच भूल भुलैया 3 ची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी भूल भुलैय्या-3 बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 


भूषण कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, ' 'भूल भुलैया' या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टवर काम करण्यास आम्ही लवकरच सुरूवात करणार आहोत. भूल भुलैय्याचे दोन्ही पार्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यामुळे आम्हाला या  चित्रपटाचा पुढचा पार्ट लवकरच रिलीज करायचा आहे. आमची टीम भूल भुलैय्या 3 चे डिटेल्स तुमच्यासोबत लवकरच शेअर करतील.'


आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 23.51 कोटींची कमाई केली. सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.75 कोटींची कमाई केली. आता पाचव्या दिवशी या चित्रपटानं 9.56 कोटींची कमाई करुन  76.27 कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होईल? याची कार्तिकचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :