Political Controversy Between BJP-NCP : कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं येणार आहेत. मात्र या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. 


माजी मंत्री राम शिंदेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी यासाठी पुढाकार घेतला असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, हा जयंती सोहळा नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे, अशी टीका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली आहे. 


हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा - राम शिंदे
माजी मंत्री राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिंदे म्हणाले, या जयंतीला आमदार रोहित पवारांकडून राजकीय स्वरूप देण्यात आले असून हा जयंती उत्सव नसून राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा असल्याची टीका राम शिंदेंनी केलीय. दरम्यान, अहिल्यादेवी भक्तांची कुचंबना होतेय, या जयंतीला राजकीय स्वरूप देणे चुकीचे आहे. प्रशासनावर राजकीय दबाव देण्यात येत असल्याचा आरोप शिंदेंनी केलाय.


पडळकर आणि शरद पवार आमने सामने येणार का?


भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली बारामतीहून चौंडीला रॅली काढण्यात येणार आहे. त्यांचेही चौंडीत सभा घेण्याचे नियोजन आहे. पडळकर आणि शरद पवार आमने सामने येणार का? यावरून राजकीय चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जन्मोत्सवसोहळा होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं येणार आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह ७, डीवाय एसपी, २५ पीआयसह हजाराहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. सकाळी साडे दहानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल.


पडळकरांना परवानगी नाकारली?


भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली बारामतीहून चौंडीला रॅली काढण्यात येणार आहे. त्यांचेही चौंडीत सभा घेण्याचे नियोजन आहे. मात्र गोपीचंद पडळकरांना परवानगी नाकारली असून या रॅलीला अद्याप परवानगी मिळाली नाही असा आरोप राम शिंदेंनी केला आहे.