Adrushya : मंजरी फडणीस आणि पुष्कर जोगच्या 'अदृश्य' चित्रपटाचं पोस्टर लाँच; लवकरच होणार रिलीज
पुष्कर जोग आणि मंजरी फडणीसच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले आहे.
Adrushya : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आजपर्यंत ताल, परदेस (Pardes), कहो ना प्यार है, वेल कम बॅक (Welcome Back) इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा ’अदृश्य’ (Adrushya) 13 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि मंजरी फडणीस (Manjari Fadnnis)च्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले आहे. पुष्कर जोग आणि मंजरी फडणीसने आपल्या कू अकाऊंटवरुन हे पोस्टर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल माहिती दिली. कबीर लाल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 13 मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
जाने तू या जाने ना या चित्रपटाद्वारे मंजरी फडणीसने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटसुष्टीत पदार्पण करत आहे.
संबंधित बातम्या
- RRR : आरआरआरच्या प्रमोशनसाठी आलियाचा खास लूक; साडीची किंमत माहितीये का?
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha