एक्स्प्लोर

नायकाच्या पत्नीला आवडलं नाही म्हणून माझ्याकडचा सिनेमा गेला, तापसी पन्नूने शेअर केला अनुभव

मी एका चित्रपटाच्या डबिंगला गेले होते. त्यानंतर तिथे माझ्या तोंडी असलेला एक संवाद तिथल्या नायकाला आवडला नाही म्हणून माझा हा संवाद काढून टाकण्यात आला, असं तापसीने सांगितलं.

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीचे नियम वेगळे आहेत. बॉलिवूडमध्ये कोण कुणाला कधी आणि कसं काम देईल हे सांगता येत नाही. कित्येकदा मिळालेलं कामही निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून अनेकदा मुलाखतींमध्ये कलाकार पाईपलाईनमध्ये असल्याचं सांगतात. कारण, सिनेमात घेण्याबद्दल चर्चा झाली असली तरी जोवर सिनेमाचं चित्रिकरण सुरू होत नाही तोवर काही खरं नसतं. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री तापसी पन्नूला आला आहे. तापसीनेच आपल्याबाबत घडलेली घटना बोलून दाखवली आहे.

तापसी पन्नू ही मेहनतीने इंडस्ट्रीत स्थिरावली आहे. पिंक, बेबी, नाम शबाना, जुडवा 2 आदी अनेक चित्रपटांमधून तापसी पन्नूने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या थप्पड सिनेमानेही चांगली लोकप्रियता मिळवली. थप्पडसारख्या सिनेमात कणखर भूमिका वठवणारी तापसी आपल्या रोजच्या जगण्यातही तितकीच स्पष्टवक्ती आहे. म्हणूनच रिया चक्रवर्तीला सुशांत मृत्यू प्रकरणात अटक झाल्यानंतर तापसीने आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी कंगना रनौतसोबत तिचं शीतयुद्धही सुरू होतं. आता हा सगळा प्रकार शांत झाल्यावर तापसीने आपल्याला आलेले अनुभव कथन केले आहेत.

तापसी आता प्रसिद्ध अभिनेत्री बनली असली तरी तिलाही अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. आपला अनुभव कथन करताना तापसी म्हणाली, 'इंडस्ट्रीत काम करताना अनेक अनुभव येतात. मी एका सिनेमात नायिकेची भूमिका करण्यासाठी निवडले गेले होते. पण त्यानंतर या सिनेमात जो मोठा नायक होता त्याच्या पत्नीला मी सिनेमात असणं रुचलं नाही. त्यामुळे तिच्या मताचा विचार करून मला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं आणि माझ्याजागी नव्या नायिकेला घेण्यात आलं. म्हणजे सिनेमाला काय महत्वाचं वाटतं त्यापेक्षा हिरोच्या पत्नीला काय वाटतं ते महत्वाचं असतं. असे अनेक अनुभव आहेत. मी एका चित्रपटाच्या डबिंगला गेले होते. त्यानंतर तिथे माझ्या तोंडी असलेला एक संवाद तिथल्या नायकाला आवडला नाही म्हणून माझा हा संवाद काढून टाकण्यात आला. असं खूपदा होत असतं. '

तापसीच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने काम दिलं जातं वा काढून घेतलं जातं ते लोकांसमोर येऊ लागलं आहे. बॉलिवूडच्या याच कामकाजाला कंटाळून अनुभव सिन्हा, सुधीर मिश्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी आपण बॉलिवूड सोडत असल्याचं सांगितलं होतं. आता तापसीच्या या वक्तव्यांमुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
Embed widget