Tamannaah Bhatia-Vijay Varma Breakup : बॉलिवुड जगतातील कलाकारांच्या प्रेमकरणाच्या कहाण्या रोजच चर्चेत असतात. बॉलिवुडमध्ये अनेक जोड्यांनी प्रेमात पडल्यानंतर एकमेकांशी लग्न केलेलं आहे. पण याच बॉलिवुडमध्ये काही जोड्या अशाही आहेत, ज्यांनी बरीच वर्षे एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिग्गद अभिनेता विजय वर्मा आणि सुंदरतेच्या बाबतीत अनेकींना मागे टाकणारी तमन्ना भाटिया हे एकमेकांच्या प्रेमात होते. पण आता मात्र त्यांच्या नात्याविषयी एक नवी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.
दोघांच्या लग्नाची चर्चा मात्र..
गेल्या अनेक दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत होते. रिलेशनशीमध्ये आल्यानंतर हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपलं नातं फार काळ लपवून ठेवलं नव्हतं. हे दोघेही प्रेमात फार पुढे गेले असून लवकरच ते लग्न करणार आहेत, असंही म्हटलं होतं. तशी तयारीही चालू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता त्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा म्हणजेच ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून सोबतचे फोटोही डिलीट केल्याचं म्हटलं जातंय.
दोघांचं ब्रेकअप, फॅन्सना धक्का
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार तम्मना भाटिया आणि विजय वर्मा यांनी ब्रेकअप केलं आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या सध्यातरी चर्चाच आहेत. कारण याबाबत या कपलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चेनंतर मात्र त्यांच्या फॅन्सना धक्का बसला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ते विभक्त झाले आहेत. मात्र वेगळे झाले असले तरी त्यांनी एकमेकांचे कायम चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. सध्यातरी तमन्ना आणि विजय वर्मा आपापल्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत.
दोघांनीही नातं केलं होतं सार्वजनिक
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे लस्ट स्टोरीच्या सिझन दोनमध्ये दिले होते. याच सिरीजच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी त्यांचं नातं सार्वजनिक केलं होतं. त्यानंतर दोघेही पापाराझींनाही एकत्र मिळून फोटो कढण्यासाठी वेगवेगळ्या पोझ द्यायचे. आता हे दोघेही ब्रेकअप झाल्याचं कधी जाहीर करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
हेही वाचा :
Nora Fatehi :साकी साकी गर्ल अभिनेत्री नोरा फतेहीचा गोल्डन लूक; चाहते घायाळ!