Pooja Banerjee : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Pooja Banerjee) आणि तिचा पती संदीप सेजवाल आता एका चिमुकलीचे पालक झाले आहेत. 'कुमकुम भाग्य' आणि 'कसौटी जिंदगी की 2' मधून घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या पूजाने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुंबईतील रुग्णालयात पूजाच्या मुलीचा जन्म झाला आहे. गेल्या महिन्यातच अभिनेत्रीने 'कुमकुम भाग्य' या शोमधून ब्रेक घेतला होता. तिने तिच्या संपूर्ण गरोदरपणातही या शोमध्ये काम केले होते.


पूजाचा भाऊ नील बॅनर्जी याने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, 'आम्ही सध्या नागपुरात आहोत आणि कुटुंबातील या छोट्या पाहुण्याच्या आगमनाने खूप उत्सुक आहोत. घरातील सर्व सदस्य खूप आनंदी झाले आहेत. सध्या संदीप आणि त्यांची आई पूजाची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात आहेत. आम्ही देखील बाळाला पाहण्यासाठी आता फार वाट पाहू शकत नाही. लवकरच आम्हीही त्याला भेटायला जाऊ.’ पूजाने देखील तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, बाळाच्या जन्मानंतर ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीला जाईल.



गर्भावस्थेतही करत होती काम!


पूजाने तिच्या गरोदरपणात पूर्णवेळ मालिकेमध्ये काम केले होते. ती सतत मालिकेसाठी शूटिंग करत होती. मात्र, शेवटच्या अर्थात नवव्या महिन्यात पाऊल ठेवताच, तिने या शोला अलविदा केला होता. त्यावेळी पूजाने सांगितले की, ‘मला माहित आहे की, तो आनंदाचा दिवस जवळ येत आहे, पण मी शो सोडण्यास अजूनही तयार नव्हते. सेटवर सर्वांकडून मिळणारे प्रेम पाहून खूप आनंद झाला. सेटवर सगळ्यांनी माझी काळजी घेतली.’


पूजाची कारकीर्द


पूजा बॅनर्जी शेवटची 'कुमकुम भाग्य'मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने अभि आणि प्रज्ञा यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. पण, काही काळापूर्वी तिने या शोला अलविदा केला होता. पूजा बॅनर्जीने 2011 मध्ये एमटीव्ही 'रोडीज सीझन 8' मधून तिचा टेलिव्हिजन प्रवास सुरू केला, ज्यामध्ये ती फायनलिस्टही ठरली होती. यानंतर तिने 2012 मध्ये स्टार प्लस मालिका 'एक दूस से करते हैं प्यार हम'मध्ये काम केले. त्यानंतर 'कसौटी जिंदगी की 2', 'दिल ही तो है', 'कहने को हमसफर हैं', 'विक्रम बेताल की रहस्य गाथा' इत्यादींसह अनेक मालिकांमध्ये झळकली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha