Actress Maria Susairaj : गुन्ह्याच्या काही अशा घटना समोर येतात, जे ऐकून माणूसकीवर विश्वास ठेवावा की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. नीरज ग्रोवर हा तरुण बालाजी प्रोडक्शन हाउसमध्ये कास्टिंग डायरेक्टर होता. या दरम्यान, त्याचं अभिनेत्री मारियावर प्रेम जडलं. सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण, एक दिवस अचानक नीरज गायब झाला. त्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता, त्यामुळे अखेरीस हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिस तपासात जी माहिती समोर आली, त्यांने ऐकणाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 


बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे


नीरज ग्रोवर बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात पोलिसांना नीरजच्या मोबाईल फोनची लोकेशन मिळाली आणि ही घडना उघडकीस आली. पोलिसांच्या तपासात नीरज्या फोनचं लोकेशन अभिनेत्री मारिया सुसाइराज हिच्या घरी दाखवलं. यानंतर पोलिसांनी मारियाला अटक केली. यानंतर पोलिस तपासात मारियाने नीरजची हत्या केल्याचं कबूल केलं आणि त्याच्या मृतदेहाचे 300 तुकडे केल्याचं सांगितलं.


हत्या करुन बॉयफ्रेंडसोबत शॉपिंग 


हे प्रकरण 2008 मधील आहे. मारिया फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करत होती. इंडस्ट्रीमध्ये नाव कमावून सेलिब्रिटी होण्याची तिची इच्छा होती. यादरम्यान, तिची ओळख नीरज ग्रोवरसोबत झाली. इंडस्ट्रीमध्ये काम मिळवून देण्यासाठी मारियाची मदत करण्याचं नीरजने मान्य केलं. यादरम्यान, दोघांचं नातं गहन होत गेलं. नीरजसोबत तिची जवळीक वाढत असताना तिने नीरजला अंधारात ठेवलं. मारियाचं रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने नीरजपासून लपवलं. मारिया मैसूरमध्ये राहणाऱ्या जेरोम मैथ्यू लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये होती.


बॉयफ्रेंडला खटकत होती नीरज-मारियाची मैत्री


इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आणि हिरोईन बनण्यासाठी मारियाने मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान बॉयफ्रेंडसोबत बोलताना मारिया नीरजचा उल्लेख करायची. तिने बॉयफ्रेंडला सांगितलं की, नीरज तिचा फक्त मित्र असून तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. पण, हे खरं नव्हतं, मारिया दोघांनाही प्रेमाच्या जाळ्यात फसवत होती. मुंबईतील घरात शिफ्ट होताना नीरज तिची मदत करायला आला, पण तो परतलाच नाही.


नेमकं काय घडलं?


मुंबईतील नवीन घरात शिफ्ट होताना नीरज तिची मदत करण्यासाठी पोहोचला. यावेळी मारियाच्या बॉयफ्रेंड मैथ्यूचा फोन आला आणि त्याने बॅकग्राऊंडमधील नीरजचा आवाज ऐकला. यावेळी त्याचा पारा चढला आणि त्याने मारियाला बजावलं की, नीरज आजची रात्र तिच्या घरी थांबायला नको. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मारियाच्या घराची बेल वाजली. मारियाने दरवाजा उघडला आणि समोर नीरजला पाहताच मैथ्यूचा राग अनावर झाला आणि त्याने चाकूने सपासप वार करत नीरजची हत्या केली.


नीरजच्या मृतदेहाचे 300 तुकडे


घरात नीरज रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा मृतदेह असलेल्या खोलीतच मारिया आणि मैथ्यू यांनी शारीरिक संबंध बनवले. यानंतर दोघांनी नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. यासाठी दोघे शॉपिंग मॉलमध्ये गेले. शॉपिंग मॉलमध्ये जाऊन दोघांनी पॉलीबॅग आणि धारदार चाकू खरेदी केले. यानंतर घरी आल्यावर नीरजच्या मृतदेहाचे 300 तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावायला जात असताना, मारियाकडे असलेल्या नीरजच्या फोनवर कॉल आला जो तिने चुकून उचलला आणि हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.


हत्याकांडाने इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ


7 मे 2008 रोजी मुंबईत नीरज ग्रोवर हत्याकांडाने खळबळ उडवून दिली होती. प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या नीरजची हत्या करण्यात आली. नीरजच्या मृतदेहाचे 300 तुकडे करून जंगलात पुरण्यात आले होते. याप्रकरणी कन्नड चित्रपट अभिनेत्री मारिया सुसाइराज आणि तिचा प्रियकर एमएल जेरोम यांना पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


बापासारखी क्रिकेटर बनणार अनुष्का शर्माची लेक? वामिकाबद्दल विराट कोहली म्हणाला, "ती मस्त बॅट चालवते..."