Jaya Bachchan Corona : दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांना कोरोना झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, आता अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग लगेचच थांबवण्यात आले आहे.
करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवले आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, शबाना आझमींनंतर काही दिवसांतच जया बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याच कारणामुळे करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाच्या एका सूत्राने पोर्टलला माहिती दिली की 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले होते आणि शेड्यूल 14 फेब्रुवारीला संपणार होते. मात्र, आधी शबाना आझमी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आणि नंतर जया बच्चन. त्यामुळे करणने नुकतेच हे शूटिंग थांबवले आहे. आता त्याला बाकी कलाकार आणि क्रूबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही.
करणच्या आणखी एका चित्रपटालाही कोरोनाचा फटका!
करण जोहरने गेल्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची घोषणा केली होती. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरलाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्रही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. यासोबतच करण जोहरचा आणखी एक बिग बजेट चित्रपट ‘तख्त’ देखील कोरोनामुळे अडकून पडला आहे.
हेही वाचा :
- Mister Mummy First Look : रितेश आणि जेनेलियानं दिली 'गूड न्यूज' ; 'मिस्टर मम्मी'चा पोस्टर रिलीज
- Gangubai Kathiawadi: 'आ रही है गंगू'; बहुचर्चित गंगूबाई काठियावाडीचं नवा पोस्टर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha