Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ नवा पोस्टर नुकताच आलियानं सोशल मीडियावर शेअर केला.
आलियानं गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'आ रही है गंगू, चार फेब्रुवारीला ट्रेलर होणार रिलीज. 'या पोस्टमध्ये आलिया नाकात नथ, लाल रंगाची बिंदी आणि पांढऱ्या रंगाची साडी अशा लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरमधील आलियाच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं असून तिच्या चाहत्यांनी कमेंट करून पोस्टरला पसंती दिली आहे.'
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट 18 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याची रिलीज डेट पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. अखेर 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Dhanush पासून विभक्त झाल्यानंतर रजनीकांतच्या मुलीवर आले नवे संकट, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
Radhe Shyam Release Date : ठरलं! ‘डार्लिंग’ प्रभासचा 'राधे श्याम' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha