Corona Death: देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचा दर देखील कमी होत आहे. सध्या कोरोना संसर्गाचा दर हा 9.27 टक्क्यांवर गेला आहे. रुग्णसंख्या कमी जरी होत असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे अद्याप टळलेला नाही. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 1072 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 5 लाखांच्या पुढे गेलेली आहे. दरम्यान, या आकडेवारीनुसार भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे की, ज्या देशामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू हे कोरोनामुळे झाले आहेत. गेल्या 24 तासामध्ये देशात 1 लाख 49 हजार 394  नवीन कोरोना रुग्णांची नोंद


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत भारतात कोरोनामुळे 5,00,055 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होणारा भारत ह जगातील तिसरा देश ठरला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासामध्ये देशात 1 लाख 49 हजार 394  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशात मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1072 जणांचा मृत्यू झाला आहे.  


 







दरम्यान, देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही घटली आहे, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 14 लाख 35 हजार 569 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 5 लाख 55 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल देशात 2 लाख 46 हजार 674 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत देशात 4 कोटी 17 हजार 88 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात लसीकरण देखील वेगाने वाढत आहेत. आत्तापर्यंत देशात कोरोनाचे 168 कोटीहून अधिक डोस दिले आहेत. काल देशात 55 लाख 58 हजार 760 लसीकरणाचे डोस दिले आहेत.


राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत देखील चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 252  नव्या रुग्णांची भर पडली असून 75 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 235  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मागील 54 तासात राज्यात एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत 3 हजार 334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1 हजार 701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: