अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू
गोव्यात झालेल्या एका भीषण अपघातात पुण्यात राहणाऱ्या नवोदित अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

पणजी : गोव्यात झालेल्या एका भीषण अपघातात पुण्यात राहणाऱ्या नवोदित अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरी उमेश देशपांडे (वय 25) आणि शुभम देडगे (वय 25) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. येथील ईश्वरी देशपांडे ही नवोदित अभिनेत्री होती.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ईश्वरी आणि शुभम हे सोमवारी पहाटेच्या सुमारास गोव्यातील अंजुना बीचकडे निघाले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अरुंद रस्त्यावरून जात असताना त्यांची कार एका झाडाला धडकली आणि जवळच असणाऱ्या खाडीत जाऊन कोसळली. बुडत असताना या दोघांनीही आम्हाला वाचवा असा धावा केला. परंतु पहाटेची वेळ असल्याने आणि अंधार असल्यामुळे कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
ईश्वरी आणि शुभम यांच्यात अनेक वर्षापासून मैत्री होती. त्यातूनच त्यांची मने जोडली होती आणि लवकरच ते लग्नही करणार होते. ईश्वरी पाषाण-सुस परिसरात तर शुभम हा नांदेड सिटी भागात राहत होता. साखरपुडा होण्याआधी दोघांनी गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु गोव्याच्या दिशेने जात असतानाच दुर्दैवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष























