एक्स्प्लोर

Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: संजीव यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या अतिशय कठीण वेळापत्रकांकडे आणि आरोग्याच्या समस्यांकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय.

Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: मनोरंजन विश्वातील (Film Industry) आणखी एक तारा निखळला असून अख्ख्या इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 51 वर्षीय अभिनेते संजीव सिंह (Actor Sanjeeb Singh) यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे (Heart Attack) त्यांचं निधन झाल्याचं समोर आलंय. संजीव यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या अतिशय कठीण वेळापत्रकांकडे आणि आरोग्याच्या समस्यांकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय.

'न्यूज 9' (News9) च्या वृत्तानुसार, संजीव सिंह (Sanjeeb Singh) मुंबईतील (Mumbai News) साकीनाका इथल्या एसजे (SJ) स्टुडिओमध्ये 'आरंभी' (Aarambhi) या टेलिव्हिजन शोच्या शुटिंगमध्ये बिझी होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'चे (FWICE) सरचिटणीस अशोक दुबे यांनी सांगितलं की, संजीव यांची शिफ्ट दुपारी 2 वाजता सुरू झालेली आणि ती पहाटे 3 वाजेपर्यंत चालली.

शुटिंगवेळी बिघडली तब्ब्येत (Actor Sanjeeb Singh Death)

(FWICE)चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी सांगितलं की, शुटिंगदरम्यान अभिनेते संजीव यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्यांनी विश्रांतीसाठी काही छोटे ब्रेक घेतले. शुटिंग संपल्यानंतर ते स्वतःच्या मोटारसायकलवरून घरी निघाले. वाटेत पेट्रोल भरण्यासाठी ते एका पेट्रोल पंपावर थांबले, तिथेच अचानक कोसळले. तिथेच त्यांना हॉर्ट अटॅक आल्याचं सांगितलं जातंय. 

कुटुंबासाठी आर्थिक मदतीचं आवाहन (Actor Sanjeeb Singh Family)

अभिनेते संजीव यांच्या कुटुंबात त्याची बहीण आणि भाऊ यांचा समावेश आहे, जे कोलकाता इथे राहतात. दुबे यांच्या माहितीनुसार, त्यांची बहीण घटस्फोटित आहे, तर त्यांचा भाऊ गंभीर आजारी आहे. या घटनेनंतर कूपर रुग्णालयात अभिनेते संजीव यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आलं. 'एफडब्ल्यूआयसीई'नं (FWICE) शोकाकुल कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे आणि अंत्यसंस्कारासाठी अभिनेत्याचं पार्थिव एअर कार्गोनं कोलकाताला नेण्याची व्यवस्था केली जातेय.

अभिनेते संजीव यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांच्या कामाच्या दीर्घ आणि शारीरिकदृष्ट्या थकवणाऱ्या तासांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दुबे यांनी सांगितलं की, 'एफडब्ल्यूआयसीई'नं सोनी आणि 'डॉक्टर्स फॉर यू' (Doctors For You) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यानं गेल्या सहा आठवड्यांपासून शुटिंगच्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित केली आहेत. या उपक्रमांतर्गत, सेटवरच्या सर्वांचं ब्लड प्रेशर तपासणं, आवश्यक औषधं देणं आणि वैद्यकीय सल्ला देणं यासाठी शुटिंगच्या ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. नियमित आरोग्य तपासणी सुविधांची उपलब्धता वाढवून हा कार्यक्रम अधिक व्यापक करण्याची फेडरेशनची योजना आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टने वेधले लक्ष

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget