एक्स्प्लोर

Salman Khan: जीवे मारण्याची धमकी, सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

Salman Khan On Death Threat: बॉलिवूडचा स्टार अभिनेता 'भाईजान' सलमान खानने मिळणाऱ्या धमकीवर मौन सोडलं आहे.

Salman Khan On Death Threat: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला मागील काही महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. या प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच मौन सोडत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सलमान खान याने या प्रकरणावर आधी भाष्य केले नव्हते. मात्र, त्याने धमकीबाबत थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 

बुधवारी, सलमान खानने एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. या पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत विचारण्यात आले होते. तुम्ही सगळ्या देशाचे भाईजान आहात, मग आता मिळणाऱ्या धमकीकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान खानने उत्तर देताना म्हटले की, मी सगळ्यांचा भाई नाही, काहींचा 'भाई' आहे..तर कोणाचा तरी 'जान' आहे. असे उत्तर देत सलमान खानने धमकीवर थेट उत्तर देणे टाळले. 

लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती

'एबीपी'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची उघडपणे धमकी दिली.  आमच्या भागात सलमान खानने काळवीट मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन. मी सध्या गुंड नाही, पण सलमान खानला मारल्यावर गुंडा बनेन, असेही लॉरेन्स म्हणाला होता. 

सलमान खानला धमकीचा ई-मेल 

यानंतर सलमान खानला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आल होता. ज्यामध्ये 'गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना सलमान खानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. बघितली नसेल तर बघायला सांगा. प्रकरण बंद करायचं असेल तर प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे, पुढच्या वेळी फक्त झटकाच बसेल, अशी धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला होता. 

सलमान खानचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

सलमान खान लवकरच 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे 'किक 2', 'टायगर 3' सारखे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: 'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?
Pranit More Controversy: प्रणित मोरे आक्षेपार्ह कन्टेन्टमुळे पुन्हा तोंडावर पडला! सोशल मीडियावर मागितली माफी; 'तो' व्हिडीओही हटवला, नेमकं घडलं काय?
प्रणित मोरे आक्षेपार्ह कन्टेन्टमुळे पुन्हा तोंडावर पडला! सोशल मीडियावर मागितली माफी; 'तो' व्हिडीओही हटवला, नेमकं घडलं काय?
Satish Sanpal Dubai Billionaire Success Story: बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
बुर्ज खलीफामध्ये घर, बायकोकडे 40 किलो सोनं, एक वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज्ड रॉल्स-रॉयस अन्...; दुबईत अब्जावधींचं साम्राज्य उभारणारा सतीश सनपाल कोण?
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवनं 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीजमधील रोल का नाकारला? म्हणाला, 'त्यांनी सांगितलेली मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक...'
सिद्धार्थ जाधवनं 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीजमधील रोल का नाकारला? म्हणाला, 'त्यांनी सांगितलेली मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक...'

व्हिडीओ

Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026 : अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
Delhi's Malviya Nagar Fire: दिल्लीत भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू, लोकांचा जीव वाचवायला स्थानिकांनी जमिनीवर गाद्या अंथरल्या अन्....
दिल्लीत भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू, लोकांचा जीव वाचवायला स्थानिकांनी जमिनीवर गाद्या अंथरल्या अन्....
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
Tukaram Mundhe Beed FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Kerala Crime:आईच्या बॉयफ्रेंडकडून अमानुष छळ, डोकं भिंतीवर आपटून संपवलं; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
जेवताना खोकला, आईचा बॉयफ्रेंड चिडला, पाय देऊन चिमुकल्याची हाडं मोडली; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
Embed widget