एक्स्प्लोर

Kantara Mimicry: पवित्र देवतेची नक्कल करणं भोवलं, कोर्टाच्या दणक्यानंतर रणवीर सिंहचा मोठा निर्णय; आता, चामुंडी हिल्सवर जाणार

Ranveer Singh kantara Controversy: कांतारा प्रकरणामुळे अभिनेता रणवीर सिंहला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

Kantara case Ranveer Singh: कांतारा चित्रपटातील पवित्र देवतेची नक्कल केल्यामुळे अभिनेता रणवीर सिंह हा प्रचंड ट्रोल झाला होता. त्याला देवतेची नक्कल करण्यावरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. नेटकऱ्यांनी तसेच देवतेला मानणाऱ्यांनी अभिनेत्यावर टीकेचे तोफ डागली.  याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. रणवीर सिंहनं या प्रकरणी माघार घेतली आहे. आपण म्हैसूरच्या चामुंडी हिल्सवर जाऊन देवतेची माफी मागणार,  अशी ग्वाही देखील दिली. यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. 

नेमकं प्रकरण काय? (Ranveer Singh Kantara)

2025 साली गोव्यात (IFFI) चा सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात रणवीर सिंह उपस्थित होता. त्यानं  कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटातील दैव परंपरेची तसेच अभिनेता ऋषभ शेट्टीची नक्कल केली. तसेच पवित्र देवतेचा उल्लेख त्यानं स्त्री भूत असा केला होता.  त्यानं केलेल्या नक्कलनंतर अभिनेता रणवीर सिंह प्रचंड ट्रोल झाला. भारतासह कर्नाटकातील लोकांच्या हिंदू  भावना दुखावल्या गेल्या. 

व्हिडिओ व्हायरल होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. काहींनी  अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली.  बंगळूरुच्या हायग्राउंड्स पोलीस ठाण्यात रणवीर सिंहविरोधात तक्रारीनुसार, गुन्हा  दाखल करण्यात आला. अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. न्यायालयामध्ये न्यायमुर्ती एम. नागप्रसन्ना यांनी अभिनेत्याला चांगलंच फटकारलं. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Tribal Box (@thetribalbox)

रणवीरच्या वतीने केस लढणारे वकील साजन पूवय्या यांनी न्यायालयात  बाजू मांडली. रणवीरची बाजू सांगताना वकील म्हणाले, 'रणवीरला पश्चाताप होतो आहे. न्यायालयात अॅफिडेव्हिट सादर करणार आहोत. तसेच तो म्हैसूर येथील चामुंडी हिल्सवर जाऊन देवीचं  दर्शन घेऊन माफी मागेल', असं वकील म्हणाले.

अभिनेता रणवीर सिंह सध्या धुरंधर 2मुळे चर्चेत आहे.   त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. दरम्यान, या प्रकरणात रणवीरची भूमिका समोर आल्याने त्याचं कौतुक होत आहे. दरम्यान, रणवीर सिंह माफी मागण्यासाठी मंदिरात कधी जाणार? याची  माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या प्रकरणामुळे रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget