एक्स्प्लोर

'कालीन भैया' म्हणतात, "आता बस झाल्या गँगस्टरच्या भूमिका"

मी वर्कोहोलिकच झालो होतो. पण आता मला वेळ मिळाला आहे. त्यानंतर मी जरा सबुरीने घ्यायच ठरवलं, असं पंकज त्रिपाठी यांनी म्हटलं.

मुंबई : मिर्झापूर वेब सीरिजमुळे अभिनेते पंकज त्रिपाठी घराघरांत पोचले. आलेलं काम चोख केल्यामुळे पंकज त्रिपाठी यांचा आपला असा वर्ग तयार झाला आहे. खूप उशीरा येऊनही पंकज यांनी काम सुरू केलं. आलेल्या प्रत्येक भूमिका त्यांनी घेतल्या. कारण त्यांना या इंडस्ट्रीत स्थिर व्हायचं होतं. आता मात्र नाव आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर पंकज यांनी जरा सबुरीनं घ्यायचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळेच हे शक्य झाल्याचं ते सांगतात.

मिर्झापूर 2 ही वेबसीरिज खूपच हिट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकज म्हणातात, 'लॉकडाऊन आधी मी मला येईल त्या भूमिका स्वीकारत होतो. अर्थात मी केलेली भूमिका गाजल्यानंतर मला पुढची भूमिका यायची. मी माझं मानधनही वाढवलं. तरी भूमिका येत होत्या. एकदा एक छाप लोकांना आवडली की तशाच भूमिका तुमच्याकडे येतात. तरी मी वेगळ्या भूमिकाही केल्या. गुंजन सक्सेनामध्ये मी बापाची भूमिका साकारली. वकिलाचीही भूमिका माझ्याकडे आली होती. तीही केली. पण पुढे लॉकडाऊन आला. आणि सगळंच काम थांबलं. यावेळी मला थोडा वेळ मिळाला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी खूप काम हातात घेतलं आहे. मी वर्कोहोलिकच झालो होतो. पण आता मला वेळ मिळाला आहे. त्यानंतर मी जरा सबुरीने घ्यायच ठरवलं.'

पंकज त्रिपाठी यांना येणारी कामं पाहता ते गुंड किंवा राजकारणी असल्याचं दाखवलं जातं. पण आता मात्र पुढच्या वर्षी ते अशा भूमिकांना फाटा देणार आहेत. ते म्हणतात, 'अनलॉक झाल्यानंतर काम सुरू झालं आहे. पण मी अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. पुढच्याच वर्षी मी काम सुरु करेन. पण त्यातही मी आता काही निवडक कामं करायची ठरवली आहेत. यात एक नक्की की मी गॅंगस्टर होणार नाही. निदान 2021 मध्ये मी अशा भूमिका स्वीकारणार नाही. त्यानंतर कशा भूमिका येतात ते बघू. शिवाय माझे तीन चित्रपट येणार आहे. यात 83, मिमी, कागज या चित्रपटांचा समावेश होतो.'

गेल्या काही महिन्यांपासून वेबसीरिजने एक नवा चेहरा लोकांसमोर आणला तो होता पंकज त्रिपाठी. पंकज यांनी खूप मेहनतीने आपलं करिअर घडवलं. अनेकांना माहित नसेल, पंकज त्रिपाठी यांनी आपलं काम करताना सातत्याने आपलं मानधन वेगवेगळं ठेवलं, वाढवलं. लोकांनीही ते देऊ केलं कारण, पंकज त्रिपाठी कामही तसंच करत होते. आता मात्र पंकज यांनी निवडक काम करायचं ठरवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Alpha vs Eetha: बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा' अन् आलियाच्या 'अल्फा' चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण
बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा' अन् आलियाच्या 'अल्फा' चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण
Vidya Balan Reel On Onkar Bhojne Skit: 'हास्यजत्रे'तील ओंकार भोजनेच्या स्कीटवर विद्या बालनची रील; सई ताम्हणकरसह, नम्रता प्रियदर्शनीच्या कमेंटने वेधलं लक्ष
'हास्यजत्रे'तील ओंकार भोजनेच्या स्कीटवर विद्या बालनची रील; सई ताम्हणकरसह, नम्रता प्रियदर्शनीच्या कमेंटने वेधलं लक्ष
Anushka Sarkate Nikhil Chavan Wedding: 'कारभारी लयभारी' फेम जोडीनं खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ; हातात भगवा अन् डोक्यावर तुळस घेऊन लग्न मंडपात एन्ट्री; अनुष्का निखिलच्या विवाह सोहळ्याचा VIDEO
'कारभारी लयभारी' फेम जोडीनं खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ; हातात भगवा अन् डोक्यावर तुळस घेऊन लग्न मंडपात एन्ट्री; अनुष्का निखिलच्या विवाह सोहळ्याचा VIDEO
Upcoming Movies In July: एकाच महिन्यात 5 मोठ्या सिनेमाचा बोलबाला; जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणार तगडी लढत; कोणते चित्रपट होणार रिलीज?
एकाच महिन्यात 5 मोठ्या सिनेमाचा बोलबाला; जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणार तगडी लढत; कोणते चित्रपट होणार रिलीज?

व्हिडीओ

Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
Embed widget