बीड शहरातील एका चित्रपटगृहात प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्यासाठी बायको देता का बायको या चित्रपटातील कलावंत बीडमध्ये आले होते. ज्यात सुरेश ठाणगे, धनंजय यमपुरे आणि ऐश्वर्या कुलकर्णी या कलावंतांचा समावेश होता. याच ठिकाणी या कलाकारांसोबत चित्रपटाविषयी चर्चा करण्यासाठी काही माध्यम प्रतिनिधी आले होते. मुलाखत करत असतानाच सात ते आठ जणांचे एक टोळके या चित्रपटाच्या कलाकारांवर चाल करून आले. तुमचा चित्रपट बंद करा, असं म्हणत अश्लील शिवीगाळ करत या टोळक्यांनी सुरेश ठाणगे आणि निर्माता असलेल्या धनंजय यमपुरे यांना जोरदार मारहाण केली.
जयललितांची डुप्लिकेट; 'थलाइवी'मधील कंगनाचा न ओळखता येणारा लूक व्हायरल
माध्यम प्रतिनीधिंसमोरच कलाकारांवर हल्ला -
या मारहाणीनंतर धनंजय यमपुरे आणि सुरेश ठाणगे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, मारहाण झालेल्या एकानेही याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये दिलेली नाही. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस कॉन्स्टेबल अंबादास औसारमल यांच्या तक्रारीवरून अज्ञात सात ते आठ जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ज्या चित्रपटगृहामध्ये हा हल्ला झाला, तिथं सीसीटीव्ही चालू होते, सोबतच काही मीडियाच्या कॅमेरामध्येही हा हल्ला पूर्णपणे रेकॉर्ड झालेला आहे. असे असतानाही अद्याप हे मारेकरी कोण आहेत? हे मात्र समोर येऊ शकले नाही.
शिल्पा शेट्टी कुंद्राच्या घरी नवी पाहुणी; नाव ठेवलं...
मारहाणीचे कारण गुलदस्त्यात -
ही घटना घडून आज तीन दिवस झाले आहे. तरी हे मारेकरी कोण आहेत आणि कोणत्या कारणामुळे ही मारहाण झाली हे समोर येऊ शकले नाही. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये एवढी मारहाण होऊन सुद्धा या कलाकारांनी आणखी चुप्पी साधली आहे. या कलाकारांनी कोणतीही तक्रार पोलिसात अद्याप दिलेली नाही. पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय. म्हणूनच बायको देता का बायको या चित्रपटातील कलाकारांना झालेली ही मारहाण चित्रपटातील विषयावरून झाली की कोणत्या वैयक्तिक कारणातून झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
Beed Crime | बीडमध्ये चित्रपट गृहासमोर अभिनेता आणि दिग्दर्शकाला बेदम मारहाण | ABP Majha