Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Post: 'बाप्पा बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस...'; विद्याधर जोशींच्या 'त्या' पोस्टवर श्रुती मराठेनंतर अभिजीत केळकरही चिडला, नेमकं काय म्हणाला?
Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Post: कलावंत ढोलताशा पथकाबाबत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या अभिनेते विद्याधर जोशींना अभिजीत केळकरनं फटकारलं असून त्यानं कमेंट करत आपला संताप व्यक्त केलाय.

Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Post: गणेशोत्सव (Ganeshotsav) म्हणजे, आनंद, उत्साह आणि भक्तीभाव. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात आपल्याला या सर्व गोष्टींची अनुभूती आली. गणेशोत्सव अगदी उत्साहात पार पडला. पण, यंदाच्या गणेशोत्सवात डीजे बंदी, ढोल-ताशांचा गजर आणि त्यांचा आवाज हा मुद्दा भलताच चर्चेत होता. गणेशोत्सव म्हटलं की, ढोल-ताशे आलेच, नाहीतर गणेशोत्सव कसला? असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गणरायाचं आगमन असो वा लाडक्या बाप्पााला निरोप देण्याची वेळ, ढोल-ताशा पथकांना (Dhol-Tasha Pathak) खूप मागणी असते. गणेशोत्सवासाठी वादक कित्येक महिने आधीपासूनच तयारी करत असतात. प्रत्येक शहरांत, विभागात एक प्रसिद्ध ढोल-ताशा पथक असतंच. यापैकीच एक कलाकारांचं ढोल-ताशा पथक आहे, जे नेहमीच चर्चेत असतं.
पुण्यातलं (Pune News) प्रसिद्ध असं 'कलावंत ढोलताशा पथक' (Kalavant Dhol-Tasha Pathak) सर्वांनाच ठाऊक आहे. मराठी मनोरंजनविश्वातील (Marathi Entertainment World) अनेक सेलिब्रिटी या ढोल-ताशा पथकात सहभागी होऊन वादन करताना दिसतात. पण, सध्या 'कलावंत ढोलताशा पथक' भलतंच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनी त्यासंदर्भात केलेली फेसबुक पोस्ट. या फेसबुक पोस्टमधून विद्याधर जोशी यांनी कलावंत ढोलताशा पथकावर काही प्रश्न उपस्थित केलेत. विद्याधर जोशींच्या फेसबुक पोस्टनंतर कमेंट करुन पथकातील वादक श्रुती मराठेनं संताप व्यक्त केलेला. अशातच आता मराठी अभिनेता अभिजीत केळकर यानंही विद्याधर जोशींच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत चांगलंच सुनावलंय.
विद्याधर जोशींच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करुन अभिजीत केळकर काय म्हणाला? (Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Facebook Post)
पुण्यातील प्रसिद्ध कलावंत ढोलताशा पथकावर फेसबुक पोस्ट करत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्याधर जोशींना अभिजीत केळकरनं सुनावलंय. अभिजीतनं तशी फेसबुक पोस्ट केलीय. अभिजीत म्हणालाय की, "बाप्पा यातल्या एकाही कलाकाराला तू ओळखत नाहीस का? तुझ्याकडे त्यांचे फोन नंबर्स नाहीत का? आणि पुण्यातले, मुंबईतले कलाकार म्हणजे काय असतं? तुला एवढ्या जेन्युअली हे प्रश्न पडले असते, तर त्यांच्यापैकी कोणालाही फोन करून तू हे विचारू शकला असतास किंवा प्रत्यक्ष जाऊनही पाहू शकला असतास... तू बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस. त्यातून तुला काय साध्य करायचंय, हे तुलाच माहिती पण एकंदरीतच हल्ली नेहमी उगाच निगेटिव्ह बोलतोस. आता यावर माझ्याशी बोलायला अजिबात फोन करू नकोस, मला तुझा राग आलाय..."

अभिनेते विद्याधर जोशी यांची पोस्ट नेमकी काय? (Actor Vidyadhar Joshi On Kalavant Dhol Tasha Pathak)
एक आपली उत्सुकता...
1.हे पुण्यातल्या कलाकार पथकातले कलाकार विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ 'वादन' करतात??
2. ज्या जोशाने ते रिल्समधे वाजवताना दिसतात तितक्याच जोशात ते सतत 'वादन' करतात का?

ढोल-ताशा पथकावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर... (Shruti Marathe Reply Vidyadhar Joshi)
विद्याधर जोशींच्या पोस्टवर कमेंट करत श्रुती मराठेनं म्हटलंय की, "बाप्पा... 1.5 महिन्यांची प्रॅक्टिस 11 दिवसांत 14 वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक एवढं आम्ही करतो. कारण, आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं. बाकी आमच्या वादनाची शंका असेल, तर पुढच्या वर्षी जरुर या एक दिवस तरी बघायला... तुमचे सगळे प्रश्न सुटतील, घरी बसून फेसबुकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत बाप्पा... जे लोक आम्हाला लाइव्ह बघतात, ते असे प्रश्न फेसबूकवर टाकत नाहीत..."

श्रुती मराठेच्या कमेंटवर विद्याधर जोशींची पुन्हा कमेंट... (Vidyadhar Joshi On Shruti Marathe Comment)
अभिनेत्री श्रुती मराठेनं केलेल्या कमेंटवर विद्याधर जोशींनी कमेंट करत म्हटलंय की, "श्रुती मराठे तुझ्या पहिल्या तीन ओळींत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. धन्यवाद... माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्रत्यक्ष येऊन बघायची काहीही गरज नाही, आणि तसंही मला येऊन बघण्यापेक्षा कदाचित वाजवणं आवडेल... कारण वाजवणाऱ्याला त्रास होत नाही बघणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तो जास्त होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुला किंवा इतरांना फक्त रीलमध्ये बघितल्यामुळे प्रश्न पडले, प्रत्यक्ष बघितलं नाही, हे खरंच आहे... पण फेसबुकवर प्रश्न विचारुन तू माझ्या प्रश्नाला उत्तर दिलस याबद्दल, तुझे शतशः आभार. तुला माझा राग आला असेल तर ते योग्यच आहे..."
दरम्यान, कलावंत ढोलताशा पथकात दरवर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणुकांमध्ये संचलन आणि वादन सादर केलं जातं. मराठी मनोरंजसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केलीय, 2014 मध्ये स्थापन करण्यात आलेलं हे पथक, दरवर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये वादन सादर करताना पाहायला मिळतं. श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांच्यासोबतच इतरही अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















