एक्स्प्लोर

Aatli Batmi Phutli Marathi Movie Teaser: गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची साखळी; 'आतली बातमी फुटली'चा जबरदस्त टीझर लॉन्च

Aatli Batmi Phutli Marathi Movie Teaser: एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे 'आतली बातमी फुटली’ हा चित्रपट.

Aatli Batmi Phutli Marathi Movie Teaser: मराठी चित्रपटांनी (Marathi Movie) सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार? याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' (Aatli Batmi Phutli) हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी  घेऊन आले आहेत. या  चित्रपटाचा रंजक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 6 जूनला हा चित्रपट प्रदर्शित  होणार आहे.  

एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे 'आतली बातमी फुटली’ हा चित्रपट. टिझर मधून हे रहस्य, धमाल आणि चित्रविचत्र घटना यांची  मजेशीर झलक पाहायला  मिळतेय.  ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला 'आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. हा कॉमेडी क्राइम सिनेमा धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘सरप्राईज’ करेल असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला. 

'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची,  नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने  या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली  आहे.

पाहा टीझर : 'आतली बातमी फुटली'चा धमाकेदार टीझर 

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget