Aastad Kale: 'सगळे बाजारात विकून घ्यायला बसले नाहीत' आस्ताद काळेचा VIDEO चर्चेत; ट्रोल करणाऱ्याला सुनावलं, म्हणाला..
CJP आंदोलनाच्या बाजूने व्यक्त होणाऱ्या कलाकारांना सध्या अशाच प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागतोय.

Aastad Kale: मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) कायमच वेगवेगळ्या गोष्टींवर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते. त्याच्या वक्तव्यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विषयांवर ती भूमिका मांडताना दिसले की ट्रोलिंग सुरू होतं. अजेंडे राबवतात अशी टीका होताना दिसते. कुठल्यातरी देशविरोधी संघटनेचं पाठबळ असल्याची टीका होते. CJP आंदोलनाच्या बाजूने व्यक्त होणाऱ्या कलाकारांना सध्या अशाच प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागतोय. यावरूनच अभिनेता आस्ताद काळेची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाला आस्ताद काळे?
CJP आंदोलनावरून आस्ताद गेल्या काही दिवसांपासून व्यक्त होतोय. नुकत्याच एका व्यक्तीकडून आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून तो बोललाय. तो म्हणाला, 'गेल्या काही दिवसांपासून instagram वरील एका व्यक्तीसोबत राजकीय सामाजिक मुद्द्यांवरून आमचे परस्पर विरोधी विचार असल्यामुळे व्यवस्थित छान बोलणं होतं. ही व्यक्ती स्वतःचे मुद्दे माझ्याकडे पाठवायची. माझे मुद्दे मी काही पाठवत बसलो नाही. पण माझ्या स्टोरीज बघून मला काउंटर करणाऱ्या गोष्टी तो माणूस मला पाठवायचा. या व्हिडिओमध्ये मी काही फोटोही जोडणार आहे. एक जून रोजी या व्यक्तीने मला मेसेज केला, बेरोजगारी आणि विकास बाजूला ठेवून हे बघा. धर्म, धर्मभेद, अन्याय अशा गोष्टी तो बोलला. या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही. मला गंमत याची वाटली की, तो व्यक्ती स्वतः 30-35 वयाचा असेल. बेरोजगारी आणि विकास बाजूला ठेवा हा प्राधान्यक्रम आहे या लोकांचा. त्यामुळे या माणसाच्या मेसेजकडे मी पुढे दुर्लक्ष करायला लागलो. तिला काही दिवसांपासून मी ज्या स्टोरी पोस्ट करतोय, माझं मत मांडण्याचा तो प्रयत्न आहे. तो माझा हक्क आहे. त्यावरून कोणी मला बोलतही नाही, पण मगाशी या व्यक्तीने मला एक रील पाठवली. आणि त्यावर एक विलक्षण प्रश्न त्याने मला विचारला- या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला शेअर करणारच आहे. या प्रश्नाचे उत्तरही मी दिलं आहे. '
View this post on Instagram
"कलाकाराला किंवा कोणालाही प्रश्न विचारायला उभे राहिला की तो अँटी नॅशनल आहे, किंवा कुठल्यातरी शक्तीकडून राष्ट्रद्वेषी, किंवा राष्ट्रविरोधी संघटनांकडून आर्थिक पाठबळ मिळतं, या धोरणावर यांचा इतका पक्का विश्वास आहे की, यांना असं वाटलं की हे जसे विकले गेले तसेच सगळे विकले गेलेत. तर तसं नाहीये. माझं काम बरं चालू आहे. माझ्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर माझ्यापुरती प्रगतीही मी करतोय. असल्या लोकांना सोशल मीडिया असल्यामुळे काही शब्द वापरता येत नाही. ज्या लोकांना हे पडतं त्यांनी ते केलं असेल. त्याबद्दल माझा आक्षेप आहेच. अशा लोकांना मनोरुग्ण अशी उपाधी दिली होती. यांना माझी कळकळीची विनंती आहे की बरे व्हा." असंही तो म्हणाला.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















