एक्स्प्लोर

Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?

Aamir Khan Third Wife Gauri Spratt: आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त त्यानं आपली जोडीदार, गौरी स्प्रॅट हिची प्रसारमाध्यमांशी ओळख करून दिली होती.

Aamir Khan Third Wife Gauri Spratt: सिनेमा असो वा वैयक्तिक आयुष्य... बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्टनिस्ट' (Mr. Perfectionist) म्हणजेच, आमिर खान (Aamir Khan) नेहमीच काहीतरी परफेक्ट आणि हटके करण्यासाठी ओळखला जातो. वयाच्या साठीतही प्रेमाची नवी व्याख्या लिहिणाऱ्या आमिर खानच्या आयुष्यात आता एका नव्या 'परफेक्ट' पार्टनरची एन्ट्री झालीय. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे आमिरसोबत नेहमी दिसणी गौरी स्प्रॅट (Gauri Spratt). हिच्याशीच 5 जुलैला आमिर तिसरं लग्न करतोय. आता ही गौरी नेमकी आहे तरी कोण?

आमिर खान (Actor Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त त्यानं आपली जोडीदार, गौरी स्प्रॅट हिची प्रसारमाध्यमांशी ओळख करून दिली होती. तेव्हापासूनच, त्यांच्या या नात्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट आपल्या या नात्याला एका नव्या टप्प्यावर नेण्याच्या तयारीत आहेत. आमिर खानच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं येत्या 5 जुलै रोजी एका अत्यंत साध्या समारंभात विवाहबंधनात अडकणार आहे. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही मोजकेच जवळचे मित्र उपस्थित राहतील, असंही सांगितलं जातंय. या लग्नाच्या बातमीमुळे गौरीचे नाव पुन्हा एकदा अचानकपणे प्रकाशझोतात आलं. साहजिकच, ती कोण आहे? ती काय करते? तिचं शिक्षण कुठे झालं? आणि ती मूळची कुठली? असे प्रश्न साऱ्यांनाच पडले आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

5 जुलैला आमिर खान पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत (Aamir Khan Third Wife Gauri Spratt)

NDTV नं दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा भव्यदिव्य नसेल, तर अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीनं पार पडेल. लग्नाचे विधी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जातील. या जोडप्याच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर आणि गौरी गेल्या जवळपास एका वर्षापासून एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहत आहेत. या जोडप्यानं आपल्या नात्याला बहरण्यासाठी पुरेसा वेळ दिला आणि आता त्यांनी या नात्याला अधिकृत स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाचे सोपस्कार अत्यंत सरळ आणि साध्या पद्धतीनं पार पडतील, ज्यामध्ये कायदेशीर औपचारिकतेवरच प्रामुख्यानं भर दिला जाईल.

गौरी स्प्रॅट कोण? (Who Is Gauri Spratt?)

गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची असून ती एका अँग्लो-इंडियन कुटुंबातली आहे. तिचे वडील तमिळ-ब्रिटिश आहेत, तर तिच्या आईचा वारसा पंजाबी-आयरिश आहे. तरीही, जेव्हा तिला तिच्या ओळखीबद्दल विचारलं जातं, तेव्हा गौरी स्वतःचा उल्लेख अभिमानानं 'भारतीय' असाच करते. एका संभाषणादरम्यान, आमिर खाननं ही माहिती दिली की, गौरीचे आजोबा मूळचे ब्रिटिश होते. तरीही, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही त्यांच्याबद्दल लेखन केलं आहे.

गौरी प्रोफेशनल लाईफमध्ये काय करते? (Gauri Spratt Profession)

गौरी स्प्रॅट बऱ्याच काळापासून बंगळुरूमध्ये राहत होती आणि ती व्यावसायिकदृष्ट्या Business and Management क्षेत्रांशी जोडलेली आहे. सध्या, ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसशीही संबंधित आहे. दरम्यान, तिला सिनेसृष्टीचा झगमगाट आणि ग्लॅमरपासून दूर राहणंच अधिक पसंत आहे. त्यामुळे ती सार्वजनिक व्यासपीठांवर क्वचितच दिसून येते. तिच्या 'लिंक्डइन' (LinkedIn) प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, गौरीचं शिक्षण 'ब्लू माउंटेन स्कूल'मध्ये झालं आणि त्यानंतर तिनं फॅशनशी संबंधित एक अभ्यासक्रम पूर्ण केला. याव्यतिरिक्त, गौरीनं लंडन येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स'मधून 'स्टायलिंग आणि फोटोग्राफी'मधील FDA अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

गौरी स्प्रॅट 6 वर्षाच्या मुलाची आई

आमिर खानसोबत संसार थाटणारी गौरी स्प्रॅट एका सहा वर्षांच्या मुलाची आहे. आमिर खानने स्वतःच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यानं सांगितलेलं की, त्याची मुलं जुनैद आणि इरा हेसुद्धा गौरीला भेटले आहेत आणि त्या दोघांनाही तिच्या सहवासात अत्यंत सहज वाटतं. गौरीचे कौतुक करताना आमिर म्हणालेला की, तिच्या सहवासात असताना त्याला अगदी 'आपल्या घरी असल्यासारखं' वाटतं. हेच कारण आहे की, कालांतरानं त्यांचं नातं अधिकच घट्ट झालंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amir Khan Third Marriage Date Confirm: वयाच्या साठीत अमीर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार; 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटसोबत संसार थाटणार, तारीख, मुहूर्त ठरला

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Embed widget