Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) च्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील कहानी हे गाणं प्रदर्शित झालं. आमिरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लाल सिंह चड्ढा हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या आईनं म्हणजेच जीनत हुसैन (Zeenat Hussain) यांनी दिलेल्या रिअॅक्शनबद्दल सांगितलं. 


एका मुलाखतीमध्ये आमिर म्हणाला, 'माझ्या आईनं लाला सिंह चड्ढा या चित्रपटाचा  टेस्ट स्क्रीनिंग शो पाहिला. तिला हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटामधील एकही सिन कट न करण्याचा सल्ला माझ्या आईनं मला दिला. माझं काम मी नेहमी सर्वप्रथम आईला दाखवतो. त्यानंतर माझ्या मुलांना दाखवतो. ' 


आमिरनं पुढे सांगितलं, 'माझी आई माझ्या चित्रपटांवर चांगल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देते. जर तिला चित्रपट आवडला नाही तर ती म्हणते की, हे नक्की काय तयार केलं आहे.'






लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18  स्टडियोज  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिरसोबतच या चित्रपटामध्ये करिना कपूर, नागा चैतन्य , मोना सिंह , मानव विज हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


हेही वाचा :