एक्स्प्लोर

Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

Aamir Khan Meets Raj Thackeray: अभिनेता आमिर खान राज ठाकरे यांच्या भेटीला, कारण काय? भेटीमागचं कारण अस्पष्ट.

Aamir Khan Raj Thackeray: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या आपला भाचा इम्रान खानमुळे (Imran Khan) चर्चेत आहे. इम्रान खानला मुंबईच्या परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने  28 ऑक्टोबर 2026 पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे.  दरम्यान, अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याला मिळालेल्या नोटीशीला आव्हान दिले आहे. या सर्व प्रकरणात आमिर खान चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. आमिर खानने थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची भेट घेतली.   

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.  त्यांच्या शिवतीर्थ या निवसस्थानावर जाऊन भेट घेतली असल्याची माहिती आहे.   या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, आमिर खानसोबत त्याची पत्नी गौरी स्प्रट देखील उपस्थित होती, अशी माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले होते.  त्याला भारत देश सोडून देण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. 

आमिर खान आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचे नाते सर्वश्रुत आहे. त्या दोघांच्या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दरम्यान, इम्रान खान प्रकरणी आमिर खानने राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.  राज ठाकरे यांनीही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे.  त्यामुळे आमिर खान आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरुन सध्या चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते किरीट सौमय्या यांचा आरोप, नेमकं प्रकरण काय? (Aamir Khan and Gauri Spratt Meet Raj Thackeray at Shivteerth)

10 ऑक्टोबर 2026 रोजी अभिनेता इम्रान खान आणि त्याची मैत्रीण लेखा वॉशिंग्टन या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सीजेपीच्या आंदोलनात सहभाग होण्यासाठी  ऑगस्ट क्रांती मैदानात पोहोचले होते.  अभिनेत्याला तिथे ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे इम्रान  खानच्या आंदोलनातील सहभागाच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Anirudh Ravichander Kavya: अनिरुद्ध आणि काव्याच्या लग्नाची चर्चा; काव्याच्या सासरच्या घरी कोण कोण राहतं? सुपरस्टारशी खास कनेक्शन!

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Advertisement

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget