Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Aamir Khan Emotional On Stage: आमीर खान एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलताना भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं... त्यानंतर प्रेक्षकांमधील एक व्यक्ती उठली आणि त्याच्यासाठी टिश्यू पेपरचा बॉक्स घेऊन आली.

Aamir Khan Emotional On Stage: बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमीर खान (Aamir Khan) नुकताच 'सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला (Singapore International Film Festival) उपस्थित राहण्यासाठी सिंगापूरला (Singapore) गेलेला. तिथे एका कार्यक्रमादरम्यान, आपल्या आयुष्याबद्दल बोलताना तो भावूक झाला. आमीर खाननं सांगितलं की, गेल्या जवळपास 30 वर्षांपासून तो आपल्या कामात इतका गुंतलेला की, तो आपल्या नातेसंबंधांना आणि कुटुंबाला पुरेसा वेळच देऊ शकला नाही. कोविड-19 महामारीच्या काळात, जेव्हा त्यानं आपल्या आयुष्याचा आढावा घेतला, तेव्हा त्याला जाणीव झाली की, करिअरच्या मागे धावताना त्यानं खूप गमावलंय.
आमिर खानला वैयक्तिक नातेसंबंध गमावल्याची जाणीव
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान, आमीर खाननं कोविड-19 लॉकडाऊनच्या दिवसांची आठवण सांगितली. त्यानं सांगितलं की, तेव्हाच त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की, कामाच्या मागे धावण्यात त्याच्या आयुष्यातील जवळपास 30 वर्ष निघून गेलीत.
"कोविडच्या काळात, शांत बसून विचार करत असताना मला जाणीव झाली की, माझ्या आयुष्यातील सुमारे 30 वर्ष निघून गेली आहेत. एक-दोन किंवा पाच वर्ष पूर्णपणे कामात बुडून जाणं, एखाद्या वेड्यासारखं काम करणं, ठीक आहे. पण जर हे 30 वर्षांपर्यंत सुरू राहिलं, तर शेवटी तुम्ही तुमची नाती गमावूनं बसता... तुमची मुलं मोठी होतात आणि पाहता पाहता ती प्रौढ होतात. तेव्हा मला खूप मोठी हानी झाल्याची जाणीव झाली..."
आपल्या आयुष्यातील या पैलूवर बोलताना आमीर खान भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. 'व्हरायटी' (Variety) च्या वृत्तानुसार, त्याला भावूक झालेलं पाहून प्रेक्षकांमधील एक व्यक्ती उठली आणि त्याच्यासाठी टिश्यू पेपरचा बॉक्स घेऊन आली.
आमीर खान पुढे म्हणाला की, "मला आनंद आहे की, ही जाणीव मला 86 व्या वर्षी होण्याऐवजी 56 व्या वर्षी झालीय, कारण 86 व्या वर्षी कदाचित गोष्टी बदलण्यासाठी खूप उशीर झाला असता..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha





















