एक्स्प्लोर

Amir Khan Angry on Marriage Date Leak: लग्नाची तारीख लीक होताच आमिरचा पार चढला, गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर थेटच म्हणाला..

नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांच्या लग्नाची तारीख लीक झाल्या प्रकारावर अभिनेता अमीर खानने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. 

Amir Khan on Wedding Date Reveal:बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अमीर खान सध्या प्रचंड चर्चेत आहे, तो त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे. जुलैमध्ये आमिर खान (Amir Khan) तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची  सध्या जोरात चर्चा आहे. सध्या अनेक सार्वजनिक ठिकाणी तो गौरीसोबत स्पॉट होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची तारीखही लिक झालेली. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांच्या लग्नाची तारीख लीक झाल्या प्रकारावर अभिनेता अमीर खानने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.  त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या उत्सुकतेवर  आश्चर्य व्यक्त करत त्याने  “लोकांनी आमच्या कामावर लक्ष द्यावं" असं म्हणत सुनावलंही. लग्नाचा समारंभ खासगी आणि साध्या पद्धतीने पार पडणार असल्याचंही त्याने सांगितलं.

Amir Khan:काय म्हणाला आमीर खान?

आपल्या लग्नाच्या चर्चांवर बोलताना 'लोक त्याच्या खासगी आयुष्याबद्दल इतके उत्सुक का आहेत, हे त्याला समजत नसल्याचं तो म्हणाला.तो म्हणाला, “इतका गदारोळ का होतोय, हे मला समजत नाही. सेलिब्रिटी, विशेषतः क्रिकेटपटू आणि कलाकार यांच्या आयुष्यात लोकांना खूप रस असतो. पण लोकांनी आमच्या कामात रस घ्यायला हवा, वैयक्तिक आयुष्यात नाही.”

लग्नाचा संपूर्ण प्लॅन सांगितला..

आमिर आणि गौरी यांनी आपलं लग्न अतिशय खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता म्हणाला की, हा एक साधा समारंभ असेल, ज्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होतील.आमिर म्हणाला, “हा खूप प्रायव्हेट समारंभ असेल. घरीच एक साधं रजिस्टर्ड लग्न होईल, ज्यात दोन्ही कुटुंबीय आणि काही अतिशय जवळचे मित्र उपस्थित असतील.”सोशल मीडियाच्या युगात सार्वजनिक व्यक्तींना गोपनीयता राखणं किती कठीण झालं आहे, यावरही आमिर बोलला.अधिकृत घोषणा करण्याआधीच लग्नाची बातमी बाहेर आल्याने त्याला फार आश्चर्य वाटलेलं. तो म्हणाला, “माझ्या लग्नाची माहिती कशी लीक झाली, हे मला अजूनही समजलेलं नाही.”यंदा मार्चमध्ये त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आमिरने बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या गौरी स्प्रॅटची मीडियाशी ओळख करून दिली होती. त्यानंतर हे दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यात 'सितारे जमीन पर' च्या प्रीमियरलाही दोघे एकत्र दिसले.

आमिरचं वैयक्तिक आयुष्य

आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता होती,त्यांना आणि आमिरला  जुनैद आणि इरा दोन मुलं आहेत .त्यानंतर त्याने फिल्ममेकर किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. या दोघांना आजाद नावाचा मुलगा आहे.वेगळे झाल्यानंतरही आमिरने रीना आणि किरण या दोघींशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत. अनेकदा या तिघांनी एकमेकांबद्दलचा आदर आणि कुटुंब म्हणून एकत्र राहण्याविषयीही बोलताना दिसतात.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget