एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track: गणेश आगमनाचा लोभस प्रोमो चर्चेत; 'आई तुळजाभवानी'मध्ये AI - VFX ची कमाल, PROMO

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' ही मालिका व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार सातत्याने घडवत असून टेलिव्हिजन विश्वातले अनेक नवे तांत्रिक चमत्कार या मालिकेने घडवले आहेत.

Aai Tuljabhavani Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानीच्या गणेश आगमनाच्या प्रोमोची सध्या विशेष चर्चा सर्वत्र सुरू आहे, या प्रोमोत दिसणारे गजमुख हुबेहुब साकारलं असून या गणेशाची हलणारी सोंड आणि सोंडेचा वापर करून गणेशाने ग्रहण केलेले मोदक हा भाग खास जमून आला असून तंत्रज्ञानाची ही कमाल प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं आहे.   

'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) ही मालिका व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार सातत्याने घडवत असून टेलिव्हिजन विश्वातले अनेक नवे तांत्रिक चमत्कार या मालिकेने घडवले आहेत. एआयच्या माध्यमातून व्यक्तिरेखा साकारणे,प्रत्यक्ष कलाकार आणि एआय व्यक्तिरेखा यांच्यात संवाद घडवून व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करत पूर्ण लांबीचा प्रसंग उभा करण्याचे मराठी टेलिव्हिजन मधले पहिले आणि एकमेव यशस्वी उदाहरण आई तुळजाभवानी मालिकेने नुकतेच पूर्ण केले होते. तसेच पौराणिक दैवी गोष्टी एआयच्या माध्यमातून साकार करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ही मालिका यशस्वी ठरली आहे. आता अत्यंत लोभस विलोभनीय गजमुख, एआय तंत्रज्ञानाचा वापर करत तयार करून आई तुळजाभवानी मालिकेने व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा नवा मानंदंड निर्माण केला आहे. 

पहिल्या भागपासून आता 680 हून अधिक भाग, आई तुळजाभवानी ही मालिका तिच्या व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक वापरासाठी ओळखली जाते.  याचे श्रेय मालिकचे व्हीएफक्स दिग्दर्शन करणाऱ्या फ्लेमिंगोज व्हीएफक्स या निर्मिती संस्थेला जाते ज्यांनी विक्रम वेधा, राधा रमण यांसारख्या चित्रपटांचे, 'असुर', 'फर्जी', 'ताज', 'सिटाडेल' आणि 'गन्स अँड गुलाब्स' यांसारख्या वेबसिरीजचे आणि 'स्वराज', 'इमली', 'नजर', 'जादू है जिन्न का' आणि 'विद्रोही' यांसारख्या हिंदी मालिकांचं VFX चं काम केलं आहे. मराठीतील ही त्यांची पहिली मालिका आहे.

गजमुखाच्या निर्मितीबद्दल मालिकेचे व्हीएफक्स दिग्दर्शक प्रदीप भगत म्हणाले, "आई तुळजाभवानी ही आमचे कुलदैवत असलेल्या देवीवर आधारित मालिका असल्यामुळे हा प्रकल्प आमच्यासाठी केवळ व्यावसायिक काम नाही, तर श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. या मालिकेत सातत्याने व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करत देवीचे तेज, तिचे दैवी स्वरूप आणि तिच्या कथांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्यासाठी हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देवीची भक्ती करण्यासारखेच आहे."

"गणेश आगमनाचा प्रसंगही आमच्यासाठी अत्यंत विशेष होता. गजमुखाचे रूप प्रेक्षकांना जिवंत, लोभस आणि नैसर्गिक वाटावे, यासाठी त्याच्या रचनेपासून सोंडेच्या हालचालींपर्यंत प्रत्येक तपशीलावर बारकाईने काम करण्यात आले. एआयच्या माध्यमातून विविध रूपे तयार करून त्यातील योग्य रूप निवडण्यात आले आणि व्हीएफक्सच्या सहाय्याने त्याला जिवंतपणा देण्यात आला.", असं व्हीएफक्स दिग्दर्शक प्रदीप भगत म्हणाले

पुढे बोलताना प्रदीप भगत म्हणाले की, "गणेशाने सोंडेच्या सहाय्याने मोदक ग्रहण करण्याचा प्रसंग नैसर्गिक आणि विश्वासार्ह दिसावा, यासाठी अत्यंत मेहनत घेण्यात आली. एआयची कल्पकता आणि व्हीएफक्सचे तांत्रिक कौशल्य यांचा योग्य संगम साधत हे लोभस गजमुख साकारण्यात आले आहे. प्रेक्षकांना केवळ एक दृश्य नव्हे, तर गणेश आगमनाचा प्रत्यक्ष दैवी अनुभव मिळावा, हाच आमचा प्रयत्न आहे."

दरम्यान, आई तुळजाभवानी मालिकेत बालगणेशाचा हा गोड प्रवेश आणि त्यानंतर घडणाऱ्या रंजक घडामोडी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असून, मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता यामुळे आणखी वाढली आहे. तुळजापुरात बालगणेशाचे खट्याळ आगमन तर होणारच आहे पण कथेत देखील अजून तंत्रज्ञानाचा कोणता नवीन आविष्कार बघायला मिळणार आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kadambari Kadam Divorce : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा दुसऱ्यांदा संसार मोडला! पहिलं लग्नही टिकलं नाही; पतीने थाटला दुसरा संसार
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा दुसऱ्यांदा संसार मोडला! पहिलं लग्नही टिकलं नाही; पतीने थाटला दुसरा संसार
Sharad Kapoor : एकेकाळी शाहरुख खानसोबत गाजवला पडदा, आज ओळखणंही कठीण! आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते भावूक
एकेकाळी शाहरुख खानसोबत गाजवला पडदा, आज ओळखणंही कठीण! आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते भावूक
Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
Embed widget