Dilip Walse Patil : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना (Students) दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना कालावधीत (Corona) 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी एबीपी माझाला बोलताना दिली आहे. कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. 


गृह विभागाकडून महत्त्वाचा निर्णय
विद्यार्थ्यांना पासपोर्ट, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह खात्याने राज्यांतील 188 अंतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती मागवली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत. कोरोना कालावधीत ज्या मुलांवर आणि नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गृहविभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे की, असे गुन्हे आम्ही मागे घेत आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाचे याबाबतचे आदेश आम्ही घेणार आहोत. असे वळसे-पाटील म्हणाले. 


महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र


बैलगाडा शर्यती चालकांवरील राजकिय गुन्हे असतील. बैलगाडा शर्यतीबाबतचे गुन्हे असतील, त्याच्या संदर्भात गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सर्व जिल्हा प्रमुख लवकरच माहिती गृहखात्याला पाठवतील आणि त्यानंतर गुन्हे मागे घेतले जातील. यापूर्वी ज्या केंद्रिय यंत्रणाकडून कारवाया होत होत्या. त्याच्या प्रेसनोट काढण्यात येत नव्हत्या. किंवा कोणत्याही माध्यमातून ती माहिती बाहेर देत नव्हते. परंतु आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाणीपूर्वक माहिती बाहेर देत आहेत,  त्यातून त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य केला जात आहे. हे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे.


महत्वाच्या बातम्या


राज्यभरातील दारू विक्रेत्यांना सरकारचा मोठा दिलासा, वाढीव परवाना शुल्क दर शासनाने केले कमी


Maharashtra School : राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, उन्हाळी सुट्टी रद्द


Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...