Aadesh Bandekar : मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांच्या होम मिनीस्टर (Home Minister) या कार्यक्रमाला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आदेश बांदेकरांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 


आदेश बांदेकर यांची पोस्ट 
आदेश यांनी चाहत्यांना कोणासोबतही व्यवहार करताना काळजी घ्यायला सांगितले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'बांदेकर हे आडनाव किंवा या आडनावाशी साध्यर्म साधणारे बरेचजण मनोरंजन क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असे सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल' आदेश यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे तसेच लाइक देखील केले आहे. 






गेली अनेक वर्ष आदेश बांदेकर हे छोट्या पडद्यावरील होम मिनीस्टर या कार्यक्रामामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच  झिंग झिंग झिंगाट या शोचे आदेश यांनी सूत्रसंचलन केलं. तसेच एकापेक्षा एक, हफ्ता बंद या कार्यक्रमांमधून देखील ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha