68th National Film Awards Live updates : 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, 68 वा चित्रपट पुरस्कार जाहीर, राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तर किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार
68th National Film Awards : आज 68व्या चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करणार आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात.
'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या चित्रपटातील अभिनेत्री सायली संजीव हिने आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतली होती, आता त्या गोष्टीचं चिज झाल्याचं ती म्हणाली. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सायली संजीव हिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना किशोर कदम म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीची नोंद घेतली गेली याचा आनंद झाला. दोन चित्रपटांतील कामाची दखल घेतली गेली. दोन्ही चित्रपटांमध्ये मी मन लावून काम केलं.
गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठीचा झेंडा रोवला आहे. 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तर राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यंदाचा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यंदाचा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
जून या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींकडे सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. शबाना आझमींना पाचवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून नॉन फिचर्स फिल्ममध्ये कुंकूमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक पुरस्कारासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी या पुरस्कारांची नावं आहेत.
Best Book On Cinema : किश्वर देसाईंच्या 'द लॉंदेस्ट किस' या पुरस्काला 'बेस्ट बुक ऑफ सिनेमा' जाहीर झाला आहे.
68 व्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. अभिनेत्री कंगना रनौत, अभिनेता मनोज बाजपेयी व्यतिरिक्त, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांना 67व्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात त्यांच्या मनोरंजन विश्वातील अमुल्य योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञान भवन, दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यंदा पुरस्कारांच्या शर्यातील अनेक चित्रपटांची नावे चर्चेत आहेत. यात विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशहा’, अजय देवगणचा ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि विद्या बालनचा ‘शेरनी’ हे चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटांशिवाय साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द राइज’चाही या चर्चेत समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये अनेक श्रेणी असू शकतात, ज्याच्या आधारे कलाकारांना हे पुरस्कार दिले जातील.
National Film Awards : 68वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
मुंबई : चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली. गेल्या वर्षी या पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते झाले. यावेळी रजनीकांत यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या पुरस्कारांमध्ये काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले. या पुरस्कारात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केली. बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आज विनोदनं हा पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. बार्शीतला अभिनेता विठ्ठल काळेंच्या काजरोला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षी बार्शीतील अमर देवकर यांच्या म्होरक्या या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
पार्श्वभूमी
68th National Film Awards : माहिती आणि प्रसारण मंत्रालय शुक्रवारी (22 जुलै) 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा करणार आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात. आज दुपारी 4 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. 68वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. अभिनेत्री कंगना रनौत, अभिनेता मनोज बाजपेयी व्यतिरिक्त, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांना 67व्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात त्यांच्या मनोरंजन विश्वातील अमुल्य योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञान भवन, दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीला कंगना रनौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कंगना रनौत आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. तर, मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदा या पुरस्कारांवर कोण कोण नाव कोरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. आज 4 वाजता या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
यंदा पुरस्कारांच्या शर्यातील अनेक चित्रपटांची नावे चर्चेत आहेत. यात विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशहा’, अजय देवगणचा ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि विद्या बालनचा ‘शेरनी’ हे चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटांशिवाय साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द राइज’चाही या चर्चेत समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये अनेक श्रेणी असू शकतात, ज्याच्या आधारे कलाकारांना हे पुरस्कार दिले जातील. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -