एक्स्प्लोर

ZP Election Schedule: जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं, कोणत्या 12 जिल्ह्यात होणार निवडणूक? जाणून घ्या एका क्लिकवर

ZP Election Schedule: राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

ZP Election Schedule: नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर आता राज्याचं लक्ष जिल्हा परिषद (ZP Election) आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) आज अधिकृतपणे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

ZP Election Schedule: या 12 जिल्ह्यांत होणार जिल्हा परिषद निवडणुका

राज्यात खालील 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. 

कोकण विभाग

1. रायगड 

2. रत्नागिरी 

3. सिंधुदुर्ग 

पुणे विभाग

4. पुणे

5. सातारा

6. सांगली 

7 कोल्हापूर 

8. सोलापूर 

छत्रपती संभाजीनगर विभाग 

9 छत्रपती संभाजीनगर 

10. परभणी 

11. धाराशिव 

12. लातूर

ZP Election: निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

सूचना प्रसिद्धी : 16 जानेवारी 

नामनिर्देशन स्वीकारणे : १६ जानेवारी ते 21 जानेवारी 

छाननी : २२ जानेवारी 2026 

माघारीची अंतिम मुदत : २७ जानेवारी दुपारी ३ पर्यंत 

अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप :  २७ जानेवारी दुपारी ३:३० नंतर 

मतदान : ५ फेब्रुवारी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत 

मतमोजणी : ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून

दरम्यान, मतदान EVM च्या माध्यमातून होणार आहे. 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार आहे. एकूण 25,482 मतदान केंद्रे, सुमारे 1 लाख 28 हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रांग व प्राधान्य देण्यात येणार आहे.  राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर करणे बंधनकारक आहे.  

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यामुळे, १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, राज्यात ५ फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे महानगरांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी रंगण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा 

Municipal Corporation Election 2026: प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
Embed widget