एक्स्प्लोर

राहुल गांधींना भेटायचे होते मात्र काँग्रेस नेत्यांनी भेट होऊ दिली नाही, कलावती बांदूरकरांचा आरोप

कलावती बांदूरकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने 2005 मध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. तर 2008 मध्ये त्यांची राहुल गांधींनी भेट घेतली होती. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

यवतमाळ : मला राहुल गांधी यांना भेटायचे होते मात्र काँग्रेस नेत्यांनी भेट होऊ दिली नाही, असा आरोप कलावती बांदूरकर यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी कलावती यांच्या पतीने आत्महत्या केल्यानंतर एका संस्थेच्या माध्यमातून कलावती यांना तब्बल 30 लाखांची मदत मिळवून दिली होती. तेव्हा कलावती प्रकाशझोतात आल्या होत्या. वणी येथे झालेल्या राहुल गांधी यांच्यासभेत आज कलावती बांदूरकर ह्या देखील उपस्थित होत्या. राहुल गांधी यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून भेटण्यासाठी निरोपही पाठवला होता. मात्र, काही नेत्यांनी भेट होऊ दिली नाही असा आरोप कलावती यांनी केला आहे. पोलिसांकडूनही सुरक्षा पास मिळवून राहुल गांधी यांना भेटण्याचे प्रयत्न केले होते, मात्र ते ही शक्य झाले नसल्याचं त्या म्हणाल्या. राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या समस्या, पिकांना हमी भाव, शेतकरी विधवा पेन्शन अशा मुद्द्यांवर काही बोलायचे होते असे कलावती यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांनी 2008 मध्ये मदत करताना दोन्ही मुलांना दत्तक घेत त्यांच्या नोकरीची जबाबदारी घेण्याचे म्हटले होते. माझ्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र दुसऱ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले असून आता राहुल गांधी यांनी नोकरी लावून द्यावी अशी मागणी ही कलावती यांनी केली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी काहीच केले नाही असा आरोपही कलावतीने केला आहे. विशेष म्हणजे कलावती यांचे 'जळका' गाव हे राहुल गांधींनी सभा झालेल्या वणी मतदारसंघातच आहे. कलावती बांदूरकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने 2005 मध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. तर 2008 मध्ये त्यांची राहुल गांधींनी भेट घेतली होती.  त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget