एक्स्प्लोर

विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार : मुख्यमंत्री

नेत्यांचं इनकमिंग सुरु झाल्यावर भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगली होती. त्यावर शिवसेना आणि भाजप एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुंबई : "भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार आहे. आता बहुमताचे कोणते रेकॉर्ड मोडतो हे बघायचं आहे," असं वक्तव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत झालेल्या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नेत्यांचं इनकमिंग सुरु झाल्यावर भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगली होती. त्यावर शिवसेना आणि भाजप एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. युतीमध्येच निवडणूक लढवणार : मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणाले की, "निवडणुकाजवळ आल्या आहेत, आता भाजप स्वबळावर निवडणूक अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. पण या निमित्ताने मी सांगू इच्छितो की, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष आमची युती अभेद्य आहे. या युतीमध्येच निवडणूक लढवणार आहोत. लोकसभा निवडणूक एकत्रित लढलो, विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवणार आहोत. राज्यात पुन्हा युतीचं सरकार येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेलाही ठावूक आहे. आता बहुमताचे कोणते रेकॉर्ड आपण मोडतो हे बघायचं आहे. कारण आम्हाला मोठं यश मिळणार आहे." धाक किंवा प्रलोभनं दाखवून पक्षात घेण्याचे दिवस गेले : मुख्यमंत्री तसंच भाजपने ईडीची भीती दाखवून तसंच आमिष दाखवून आमदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "धाक किंवा प्रलोभनं दाखवून पक्षात घेण्याचे भाजपचे दिवस राहिलेले नाहीत. एक काळ होता जेव्हा भाजप लोकांच्या पाठीशी फिरायचा, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आज भाजपमध्ये येण्यास अनेक मंडळी इच्छुक आहेत. जे चांगले आहे, समाजाभिमुख आहेत, अशांना आम्ही भाजपमध्ये प्रवेश देतोय. भाजपमध्ये धर्मशाळा नाही, कोणीही उठावं, भाजपमध्ये यावं, ही परिस्थिती नाही. पण जनतेचा पक्ष जरुर आहे. इथे नेते येताना, त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि स्थान याचा विकार केला जातो." काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा भाजप प्रवेश दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Embed widget