एक्स्प्लोर

पक्षाने माझं तिकीट का कापलं? याची कारणं अजूनही शोधतोय : एकनाथ खडसे

एकनाथ खडसे म्हणाले की, मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मीसुद्धा गेले अनेक दिवस पक्षावर नाराज होतो.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्यामुळे आज पुन्हा एकदा उघड नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बातचित करत असताना त्यांनी उमेदवारी न मिळणं, मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला मिळालेली उमेदवारी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले. एकनाथ खडसे म्हणाले की, मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मीसुद्धा गेले अनेक दिवस पक्षावर नाराज होतो. मी असा काय गुन्हा केला असेल, म्हणून पक्षाने माझं तिकीट नाकारलं, याबाबतच्या कारणांचा मी अजूनही शोध घेतोय. निवडणुकीच्या निकालानंतर मी पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलेन. खडसे म्हणाले की, माझ्याऐवजी माझी मुलगी रोहिणी हिला पक्षाने उमेदवारी दिली आहे. रोहिणीला उमेदवारी देणं हा पक्षाचा निर्णय होता. ती मोठ्या मतफरकाने निवडून येईल. कोणताही कार्यकर्ता निवडून आल्यावर मला त्याचा आनंदच होईल. पक्षाबाबत बोलताना खडसे म्हणाले की, भाजपचं संघटन मजबूत आहे. राज्यात पुन्हा एकदा आम्ही बहुमताचं सरकार आणू. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. देशानं, राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. तसेच आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांमुळे आम्हाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. भारतीय जनता पक्षाला अगदी सहजपणे 135 ते 140 जागा मिळतील. यावेळी खडसे यांना विचाण्यात आले की, तुमची पक्षावर नाराजी आहे, त्याबाबत तुम्ही कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी चर्चा केलीत का अथवा करणार आहात का? यावर खडसे म्हणाले की, मला त्याबाबत कोणाशीही बोलण्याची गरज भासली नाही. गरज पडल्यास मी वरीष्ठांशी बोलेन. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडण केले. खडसे म्हणाले की, ज्या जमिनीच्या व्यवहारावरुन माझ्यावर आरोप होत आहेत, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मुळात ती वादग्रस्त जमीन सरकारची नाही, एमआयडीसीचीदेखील नाही. तसेच मी कोणतंही नियमबाह्य काम केलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget