एक्स्प्लोर

Security Deposit : निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? किती मते मिळाल्यास अनामत रक्कम वाचते?

Security Deposit : निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? ग्रामपंचायत निवडणुकीपासून राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत, प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला अनामत रक्कम द्यावी लागते.

Security Deposit : मुंबई : 'या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं...' 'या उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही...' निवडणूक निकालाच्या दिवशी अशी वाक्ये वाचायला किंवा ऐकायला सर्रास मिळतात. पण डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का?

एखादी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते. या रकमेला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम म्हटलं जातं. जर एखाद्या उमेदवाराला निश्चित मतं मिळवता आली नाही तर त्याची अनामत रक्कम जप्त होते.

ही अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. ग्रामपंचायत निवडणुकीपासून राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत, प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला अनामत रक्कम द्यावी लागते.

किती असते अनामत रक्कम?
प्रत्येक निवडणुकीतील अनामत रक्कम वेगवेगळी असते हे समजलं असेलच. लोकसभआ आणि विधानसभा निवडणुकीची अनामत रक्कमेचा उल्लेख  रिप्रेझेन्टेटिव्ह्स ऑफ पीपल्स अॅक्ट, 1951 मध्ये तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या अनामत रक्कमेचा उल्लख प्रेसिडेट अॅण्ड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट, 1952 मध्ये करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य वर्ग आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम असते. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्व वर्गातील उमेदवारांसाठी समान अनामत रक्कम असते.

कोणत्या निवडणुकीत किती रक्कम?

लोकसभा निवडणूक : सर्वसमान्य वर्गातील उमेदवारांना 25 हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागते. तर एससी आणि एसटी वर्गाच्या उमेदवारांसाठी ही रक्कम 12,500 असते.

विधानसभा निवडणूक : सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार रुये असते. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये जमा करावे लागतात.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक : सर्व वर्गासाठी अनामत रक्कम समान असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारांना 15 हजार रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते.

अनामत रक्कम जप्त का होते?

- निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उमेदवार जागेवर एकूण मतदानाच्या 1/6 टक्के म्हणजेच 16.66% मते मिळवू शकला नाही, तेव्हा त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते.

- समजा एका जागेवर 1 लाख मते पडली आणि 5 उमेदवारांना 16,666 पेक्षा कमी मते मिळाली, तर त्यांचे सर्व डिपॉझिट जप्त होईल.

- हाच फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीलाही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवण्यासाठी 1/6 मते मिळवावी लागतात.

कोणत्या परिस्थितीत अनामत रक्कम परत मिळते?

- उमेदवाराला 1/6 पेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम परत केली जाते.

- विजयी उमेदवाराला 1/6 पेक्षा कमी मते मिळाली तरीही त्याचे पैसे परत केले जातात.

- मतदान सुरु होण्यापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, अनामत रक्कम त्याच्या कुटुंबीयांना परत केले जातात.

- उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास, अनामत रक्कम परत केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Embed widget