एक्स्प्लोर

West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका

West Bengal Elections : हुमायूं कबीर यांच्या वक्तव्यांवरुन बंगालमधील मुस्लिम समूदायाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असं म्हणत एआयएमआयएमने त्यांच्याशी असलेली युती तोडली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Elections) रणधुमाळीत 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' (AIMIM) पक्षाने मोठी घोषणा केली आहे. पक्षाने हुमायूं कबीर (Humayun Kabir) यांच्या 'जनता उन्नयन पार्टी'सोबत असलेली युती तोडली असून, आता बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

युती तोडण्याचे कारण काय?

हुमायूं कबीर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ही युती तुटल्याचं एमआयएमच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. 'एआयएमआयएम'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "हुमायूं कबीर यांच्या विधानांवरून बंगालमधील मुसलमान किती असुरक्षित आहेत हे दिसून येते. ज्या विधानांमुळे मुसलमानांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, अशा कोणत्याही गोष्टीशी एआयएमआयएम स्वतःला जोडून घेणार नाही."

पक्षाने पुढे असेही म्हटले आहे की, अनेक दशकांच्या धर्मनिरपेक्ष शासनानंतरही बंगालमधील मुस्लीम समुदाय गरीब आणि दुर्लक्षित राहिला आहे. आता पक्ष कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे मैदानात उतरेल.

हुमायूं कबीर आणि 1,000 कोटींचा व्हिडीओ विवाद

तृणमूल काँग्रेसने (TMC) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये हुमायूं कबीर 'अल्पसंख्याकांचं मत वळवण्यासाठी करण्यासाठी भाजपकडून 1,000 कोटी रुपये घेण्याबाबत' बोलत असल्याचा दावा टीएमसीने केला आहे.

त्यावर हुमायूं कबीर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान इतके कमकुवत आहेत का की ते मला 1,000 कोटी रुपये देतील?" असा सवाल करत त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

भाजप नेते सुकांत मजूमदार यांनी या प्रकरणाशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत, हुमायूं कबीर हा भाजपसाठी चिंतेचा विषय नसल्याचे स्पष्ट केले.

कोण आहेत हुमायूं कबीर?

हुमायूं कबीर हे टीएमसीचे माजी नेते आहेत. 'सांप्रदायिक राजकारण' करत असल्याचा ठपका ठेवत टीएमसीने गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. मुर्शिदाबादमध्ये 'बाबरी मशीद' या नावाने मशिदीची पायाभरणी केल्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते.

पश्चिम बंगाल निवडणुकीचे वेळापत्रक

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

पहिला टप्पा : 23 एप्रिल

दुसरा टप्पा : 29 एप्रिल

निकाल : 4 मे 2026 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget