Bengal Elections 2021: पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून विधानसभेच्या 31 जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यातच उलुबेरिया मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या गौतम घोष यांच्या घरी EVM आणि VVPAT सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने एका सेक्टर अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.
सर्वांच्या विरोधात कारवाई होणार
या प्रकरणात ज्याचा समावेश आहे त्या सर्वांवर कारवाई करण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच या घटनेवरून भाजपने ममता बॅनर्जी आणि तृणमूलवर निशाणा साधला आहे. EVM आणि VVPAT हे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी कसे आले याचा तपास आता निवडणूक आयोग करत आहे.
आसाममध्येही भाजप नेत्याच्या गाडीत EVM
आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीत EVM सापडलं होतं. आता या प्रकरणाचा जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे. करीमगंज जिल्हा उप-अधीक्षक अनबामुथन यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. EVM प्रकरणात या आधीच निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे.
या घटनेनंतर निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. जप्त केलेले ईवीएम मशीन सीलबंद होते. तरीही LAC 1 रतबाडी (SC) इंदिरा एम.वी स्कूलमध्ये पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :