Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 एप्रिल 2021 मंगळवार | ABP Majha


1. मिशन 'ब्रेक द चेन' आदेशात सुधारणा, आवश्यक सेवांमध्ये पेट्रोल पंप, कार्गो सेवा, डेटा सेंटर, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळविक्रेत्यांचा समावेश


2. गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता, काल रात्री कायदेतज्ज्ञांची चर्चा तर गृहखात्याची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर


3. पंचविशीच्या पुढच्या सर्वांचं लसीकरण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे विनंती, तीन आठवड्यात सहा जिल्ह्यातल्या लसीकरणासाठी दोन कोटी डोसची मागणी


4. सोलापुरातील खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, इंजेक्शन मिळवण्यासाठी कोरोना रुग्णांचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत मेडिकलबाहेर ताटकळत


5. मिनी लॉकडाऊनमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोणत्या स्वरुपात होणार याचा आज निर्णय, शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेकडे राज्याचं लक्ष, तर नववी आणि अकरावीबाबतही निर्णय प्रतीक्षेत


 



6. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा पुन्हा स्थगित, कोरोना संकट वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा स्थगितीचा निर्णय 


7. राज ठाकरे यांची आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद, काय भाष्य करणार याची उत्सुकता, तर काल रात्री कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन संवाद


8. एनआयएकडून सचिन वाझे यांची सीएसएमटी स्थानकावर परेड, 4 मार्चला वाझे लोकलमधून ठाण्याला आल्याचा संशय 


9. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरीत मतदानाला सुरुवात, सर्व राज्यात कडेकोट बंदोबस्त 


10. 2036 पर्यंत राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत राहण्याचा व्लादमिर पुतिन यांचा मार्ग मोकळा, रशियातील संविधानातील बदलानुसार पुतिन यांच्याकडून महत्त्वाच्या कायद्यावर स्वाक्षरी