नवी दिल्ली : देशातला सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजप आज आपला 41 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपच्या स्थापना दिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. 


देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील: अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, "आपल्या परिश्रमातून भाजपला एका विशाल वटवृक्षात रुपांतर करणाऱ्या सर्व महापुरुषांना माझा प्रणाम. राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदय सिद्धांत आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप नेहमी प्रयत्नशील राहिल."


 






भाजप हा परिवार: जेपी नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही या प्रसंगी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, "कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि संघटन कौशल्याने पक्षाचा आतापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे. अत्योदयाला या आपल्या मूलमंत्राच्या आधारे राष्ट्रसेवा करणारे कार्यकर्ते हेच पक्षाचा पाया आहेत."


 






महत्वाच्या बातम्या :