एक्स्प्लोर

West Bengal Election Result 2026: नरेंद्र मोदींनी झालमुरी भेळ खालेल्या मतदारसंघात हादरवणारा ट्विस्ट, भाजप की टीएमसी, कोण आघाडीवर?

West Bengal Election Result 2026: निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाडग्राम मतदारसंघात एका दुकानात झालमुरी भेळचा आस्वाद घेतला होता.

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी (West Bengal Election Result 2026) सुरू आहे. भवानीपूर ही जागा जरी एक प्रमुख केंद्रबिंदू ठरली असली, तरी झाडग्राम ही जागाही सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. याचे कारण असे की, निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघात एका दुकानात झालमुरी भेळचा आस्वाद घेतला होता. आणि ही घटना त्यानंतर चर्चेचा एक मोठा विषय बनली होती. झाडग्राम जागेवर सध्या भाजप आघाडीवर आहे. (jhargram assembly election results 2026)

पश्चिम बंगालमधील झाडग्राम विधानसभा मतदारसंघातील पहिल्या कलांनूसार आकडेवारी समोर आली आहे. 2021 च्या निवडणुकीत झाडग्राम विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे बिरबहा हान्सदा विजयी झाले होते. परंतु आता या जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. (jhargram assembly election results 2026)

बंगालमध्ये भाजप 157 जागांवर आघाडीवर- (West Bengal Election Result 2026)

सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून येत आहेत. एकूण 293 जागांपैकी 245 जागांचे कल हाती आले असून भाजपने 157 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) 115 जागांवर खाली घसरली आहे. डावे आणि काँग्रेसची पाटी यंदाही कोरीच राहण्याची शक्यता दिसत आहे.

आतापर्यंतच्या कलांवरुन निकालाची वैशिष्ट्ये- (West Bengal Election Result 2026)

  1. भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल
  2. भाजप इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची चिन्हं
  3. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: पिछाडीवर
  4. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचीही पिछेहाट
  5. भाजप नेते सुवेंदू अधिकारींच्या नेतृत्त्वात भाजप आघाडीवर
  6. मोदींनी जिथे झालमुडी खाल्ली, तिथे भाजप उमेदवार आघाडीवर

बंगालमध्ये मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास- (West Bengal Election Result 2026)

बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे.  बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत. तर आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असली तरी सगळ्या सर्व्हेमध्ये भाजपचे हिमंता बिस्वा सरमा हे पुन्हा सत्तेत येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल, VIDEO:

संबंधित बातमी:

Election Result 2026: बंगालपासून, आसाम, केरळ, तामिळनाडू, बारामती, राहुरीपर्यंत....; कुठे कोणाची सत्ता, पहिल्या 2 तासांत हादरवणारे कल, संपूर्ण निकाल एका क्लिकवर

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा झटका, टीएमसी 100 च्या खाली, भाजप 150 जागांवर आघाडीवर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget