एक्स्प्लोर

कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : दादरमधील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावल्यानंतर, मनसे आक्रमक झाली आहे. "आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कशाला? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरेल," असा इशारा पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसंच भाजपच्या कोणत्याही नेत्याची चौकशी कशी झाली नाही?" असा प्रश्नही त्यांनी विचारला. संदीप देशपांडे म्हणाले की, "नवी भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. सीबीआय, ईडी भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत आणि या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं हे मनसेला माहित आहे." "राज ठाकरे ईव्हीएमविरोधात जे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याची भाजपला भीती आहे. मागील पाच वर्षात कोणत्या भाजप नेत्याची सीबीआय, ईडी चौकशी झाली का? असा सवाल करत मुंबै बँक, प्रकाश मेहतांचा घोटाळा या कुठल्या प्रकरणात त्यांची चौकशी झाली नसल्याचं देशपांडे यांनी स्पष्ट केलं. तसंच विधानसभेच्या तोंडावर जर अशा नोटीस पाठवल्या जात असतील तर आम्ही त्याला भीक घालत नाही, उलट हा लढा अधिकच तीव्र करु आणि आमचं कुठल्याही प्रकारचं खच्चीकरण होणार नाही. शिवाय आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कशाला? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरेल," असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. काय आहे प्रकरण? काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. Raj Thackeray Kohinoor | राज ठाकरे कोहिनूर मिल प्रकरणी ईडीच्या रडारवर? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget