एक्स्प्लोर
VIP Seats Election Results 2019 : देशातील 'हे' दिग्गज विजयी, 'या' नेत्यांचा दणदणीत पराभव
VIP Seats Election Results : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमध्ये विजय मिळाला आहे

फोटो : गेट्टी इमेज
मुंबई : देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 340 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 90 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 पेक्षा अधिक जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमध्ये विजय मिळाला आहे, मात्र बालेकिल्ला अमेठीमध्ये पराभवाचा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. विजयी उमेदवार नरेंद्र मोदी (भाजप) - वाराणसी, उत्तर प्रदेश अमित शाह (भाजप) - गांधीनगर, गुजरात राहुल गांधी (काँग्रेस) - वायनाड, केरळ आझम खान (सपा) - रामपूर, उत्तर प्रदेश = जयाप्रदा (भाजप) पराभूत अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस) - डायमंड हार्बर, पश्चिम बंगाल अनुराग ठाकूर (भाजप) - हमीरपूर, हिमाचल प्रदेश फारुक अब्दुल्ला (जम्मू काश्मिर नॅशनल कॉन्फरन्स) - श्रीनगर, जम्मू काश्मिर महाराष्ट्रात 'या' दिग्गजांना पराभवाचा धक्का आघाडीवर सोनिया गांधी (काँग्रेस) - रायबरेली, उत्तर प्रदेश असदुद्दीन ओवेसी (एमआयएम) - हैदराबाद, तेलंगणा सनी देओल (भाजप) - गुरुदासपूर, पंजाब किरण खेर (भाजप) - चंदिगढ, पंजाब गौतम गंभीर (भाजप) - पूर्व दिल्ली किरेन रीजीजू (भाजप) - अरुणाचल पश्चिम जयंत सिन्हा (भाजप) - हजारीबाग, झारखंड प्रज्ञासिंह ठाकूर (भाजप) - भोपाळ, मध्य प्रदेश शशी थरुर (काँग्रेस) - तिरुअनंतपुरम, केरळ आघाडी-पिछाडी अमेठी, उत्तर प्रदेश - स्मृती इराणी (भाजप) आघाडीवर, राहुल गांधी (काँग्रेस) पिछाडीवर पाटणासाहिब, बिहार - रवीशंकर प्रसाद (भाजप) आघाडीवर, शत्रुघ्न सिन्हा (काँग्रेस) पिछाडीवर आझमगड, उत्तर प्रदेश - अखिलेश यादव (सपा) आघाडीवर, निरहुआ/दिनेश लाल यादव (भाजप) पिछाडीवर आसनसोल, पश्चिम बंगाल - बाबुल सुप्रियो (भाजप) आघाडीवर, मूनमून सेन (तृणमूल काँग्रेस) पिछाडीवर पिछाडीवर ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेस) - गुणा, मध्य प्रदेश जयंत चौधरी (रालोद) - बागपत, उत्तर प्रदेश
आणखी वाचा




















