एक्स्प्लोर

भाजप ठरवेल त्याला निवडून देऊ, मोहिते पाटलांच्या वक्तव्यावर रणजितसिंह निंबाळकर म्हणतात...

माढ्यातून भाजप देईल त्या उमेदवाराचा प्रचार करु आणि त्याला निवडणून आणू, असं आश्वासन विजयसिंह मोहिते पाटलांनी दिलं. तर भाजपचा उमेदवार विजयदादा ठरवतील, ते जे सांगतील ते मान्य असेल, असं वक्तव्य रणजित निंबाळकर यांनी केलं आहे.

पंढरपूर : माढ्यातील उमेदवाराबाबत भाजपचा संभ्रम अद्याप संपलेला दिसत नाही. भाजप जो उमेदवार ठरवेल, त्याला आपण निवडून आणू, असं वक्तव्य माढ्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे, तर भाजप उमेदवार विजयदादा ठरवतीस, असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. भाजपकडून अजूनही माढ्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नसताना उठत असलेल्या अफवांचं खंडन करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रात्री अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर तातडीची पत्रकार परिषद बोलावली. भाजप ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणणार असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. मी भाजपमध्ये प्रवेश केला नाही, त्यामुळे मला उमेदवारी देतील, असं वाटत नाही. उमेदवारीपेक्षा कृष्णा भीमा स्थिरीकरण होणं जास्त महत्त्वाचं असल्याचंही मोहिते पाटील म्हणाले. माढ्यातून भाजप देईल त्या उमेदवाराचा प्रचार करु आणि त्याला निवडणून आणू, असं आश्वासन विजयसिंह मोहिते पाटलांनी दिलं. तर भाजपचा उमेदवार विजयदादा ठरवतील, ते जे सांगतील ते मान्य असेल, असं वक्तव्य रणजित निंबाळकर यांनी केलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माढ्यातील जागेवरुन आधी त्यांचं नाव चर्चेत होतं. त्यांनतर रणजित निंबाळकरांनी भाजपप्रवेश केल्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा झाली. आता विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर खासदार विजयसिंह मोहिते आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी अकलूजमध्ये पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. VIDEO | पार्थ पवारांना ट्राफिकचा फटका, गाडी सोडून पळापळ माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांसाठी माघार घेतली. मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यानंतर पक्षाने संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माढ्यातील सामना नेमका कोणामध्ये रंगणार, याची उत्सुकता कायम आहे. विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया  कोण आहेत विजयसिंह मोहिते-पाटील? - राज्याच्या राजकारणात जी काही मातब्बर घराणी आहेत, त्यात मोहिते-पाटील घराण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. - सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ राजकारणी आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री - 1980 ते 2009 दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार - विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघात 2009 मध्ये शरद पवार खासदार होते. - विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती सांभाळलेली आहेत. - त्यांचे पुत्र रणजितसिंह राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी कोण आहेत संजय शिंदे? - शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. - माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. - निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात - 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव - जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. - पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले. - म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष. - माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन-जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष - जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं. विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर? - सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष - अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड - खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव - स्वराज उद्योग समुहाची स्थापना - स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज - 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget