एक्स्प्लोर

Vidhan Sabha Election 2019 Results : मतदारसंघांचे अचूक निकाल, कुठे आणि कसे मिळवाल?

भाजप सत्ता कायम राखणार की विरोधक बाजी मारणार? याचं उत्तर काही तासातच मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीचे अचूक आणि सुपरफास्ट अपडेट्स एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पहिले कौल हाती येण्यास सुरुवात होईल.राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होण्याचा अंदाज आहे. तर विरोधकांचा सुपडासाफ होऊ शकतो. एबीपी माझावर सकाळी सहा वाजल्यापासून निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज सुरु होईल. टीव्हीशिवाय तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात, निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. टीव्हीसोबत वेबसाईट, फेसबुक, ट्विटरपासून अॅपवरील नोटिफिकेशनद्वारे एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट निकाल पोहोचवण्यासाठी एबीपी माझानेही खास तयारी केली आहे. वेबसाईटसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरही एबीपी माझाची टीम तैनात असेल. एबीपी माझाच्या साईटवर महाराष्ट्रातील मतदारसंघांची टॅली, लाईव्ह टीवी, लाईव्ह अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजद्वारे कोणता पक्ष आघाडीवर कोणता पिछाडीवर याची माहिती मिळेल. व्हीआयपी उमेदवारांची परिस्थिती याशिवाय तुम्ही राज्यातील व्हीआयपी उमेदवारांची परिस्थितीही वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही केवळ स्वत:च्याच नाही तर राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट वाचू शकता. प्रत्येक मतदारसंघाशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही टीव्ही आणि वेबसाईटशिवाय मोबाईल फोन आणि इतर तमाम प्लॅटफॉर्मवर निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इन्स्टॉल करुन लाईव्ह टीव्ही पाहू शकता. तुमच्याकडे अॅप असेल तर नोटिफिकेशनद्वारेही निकाल मिळतील. एका क्लिकवर विधानसभा मतदारसंघाची माहिती एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला विधानसभा मतदारसंघांचा निकाल पाहू शकता. सोबतच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कोणाचा विजय झाला होता, कोण पराभूत झालं होतं. दोन्ही पक्षांमध्ये किती मतांचं अंतर होतं. तसंच मतदारसंघात किती मतदार आहेत, त्यापैकी पुरुष किती आणि महिला किती याची माहितीही मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget