एक्स्प्लोर

उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार

भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उर्मिला टक्कर देणार आहे. याआधी अभिनेता गोविंदाने उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा गोविंदाने भाजपचे बडे नेते राम नाईक यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केलं होतं. त्यामुळे यंदा उर्मिला त्याची पुनरावृत्ती करणार की गोपाळ शेट्टी आपला गड कायम राखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, आपला लढा काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात आहे, कुठल्याही उमेदवाराविरोधात नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे. उर्मिला यांनी निवडणूक लढवत एकप्रकारे आपल्याला मदत केली आहे. आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास शेट्टींनी व्यक्त केला आहे. VIDEO | पुण्याचा काँग्रेसचा उमेदवार अद्याप अनिश्चित युतीच्या सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढलं आहे, असा घणाघात उर्मिला मातोंडकरने 'एबीपी माझा'शी बोलताना केला होता. देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? असा थेट सवालही उर्मिलाने विचारला होता. लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं उर्मिलाने बुधवारी काँग्रेसप्रवेश करताना सांगितलं होतं. उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार उर्मिलाची कारकीर्द 1977 साली वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी उर्मिलाने 'कर्म' चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. 1980 मध्ये श्रीराम लागूंसोबत झाकोळ चित्रपटातही ती झळकली. वयाच्या नवव्या वर्षी (1983) तिने शेखर कपूर यांच्या 'मासूम'मध्ये केलेली भूमिका विशेष गाजली. 'लकडी की काठी...' हे तिचं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे सांगणारा भाजप कोण? काँग्रेसवासी उर्मिला मातोंडकरचा सवाल
उर्मिलाने तिच्या कारकीर्दीत रंगिला, सत्या, दौड, जुदाई, कौन, मस्त, खुबसूरत, जंगल, भूत, पिंजर अशा असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. राम गोपाल वर्मासोबत तिचे बरेच चित्रपट गाजले. ईएमआय (2008) या चित्रपटानंतर ती हिंदीत मुख्य भूमिकेत झळकली नाही. 3 मार्च 2016 रोजी उर्मिलाने वयाने दहा वर्षांनी तरुण असलेल्या बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत विवाहगाठ बांधली. वयाच्या 45 व्या वर्षी उर्मिलाने राजकीय कारकीर्द सुरु केली

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget