UP Election Result 2022 : सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कोण स्थापण करणार याचा फैसला काही तासात होणार आहे. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
मॅजिक फिगर 202
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील. जो पक्ष 202 जागा जिंकेल तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
कुणाची प्रतिष्ठा पणाला?
- योगी आदित्यनाथ(भाजप) - गोरखपूर शहर
- चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी) - गोरखपूर शहर
- अखिलेश यादव (सपा)- करहल
- एस.पी. बघेल (भाजप)- करहल
- केशव प्रसाद मौर्य (भाजप- सिराथू
- डॉ. पल्लवी पटेल (सपा)-सिराथू
- शिवपाल यादव (सपा)- जसवंतनगर
- आझम खान (सपा)- रामपूर
- ओमप्रकाश राजभर (सपा+) - जहुराबाद
- कृष्णा पटेल (सपा+)- प्रतापगड
- स्वामी प्रसाद मौर्य (सपा)- फाझिलनगर
- दारा सिंह चौहान (सपा)- घोसी
- पंखुडी पाठक (काँग्रेस)- नोएडा
- राजेश्वर सिंह (भाजप)- सरोजिनीनगर
- आदिती सिंह (भाजप)- रायबरेली
उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले मुद्दे
- राम मंदिर निर्माण
- शेतकरी आंदोलन
- हाथरस बलात्कार प्रकरण
- लखीमपूर हिंसाचार
- गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह
एक्झिट पोल काय सांगतोय?
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.
2017 साली भाजपला बहुमत
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या
संबंधित बातम्या:
- Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'असा' पाहा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
- Election Result 2022 Date, Time : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यासाठी मतमोजणी कधी आणि कुठे पाहणार?
- Election Results 2022: निकालाचा काऊंटडाऊन सुरु, मॅजिक फिगर गाठण्यासाठी धडपड, पाहा कोणत्या राज्यात किती जागा?