TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाने केली 100 कोटींची कमाई


आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने गेल्या 14 दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. कोरोना महामारीनंतर दमदार कमाई करणारा हा चौथाच सिनेमा आहे. 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई'वर आधारित आहे. गंगूबाईला तिच्या बॉयफ्रेण्डने 1000 रुपयांमध्ये मुंबईतील कामाठीपुरामध्ये विकलं होतं. यानंतर तिने महिलांसाठी लढण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी लढा दिला. या सिनेमात आलिया भट्टसोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


'शर्माजी नमकीन'ची रिलीज डेट जाहीर


दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. ऋषी कपूर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. आता लवकरच ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


'मिशन मजनू' सिनेमाची रिलीज डेट ठरली


बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदानाच्या आगामी 'मिशन मजनू' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. 'मिशन मजनू' हा सिनेमा 10 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


'सर प्रेमाचं काय करायचं' नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रेक्षक मनोरंजनासाठी सिने-नाट्यगृहात जात आहेत. त्यामुळेच  सिने-नाट्यगृहाबाहेर सध्या हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान महिला कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कलामहोत्सवात विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होणार आहेत. कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या मकरंद देशपांडेंच्या  'सर, प्रेमाचं काय करायचं' या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे. 


'द कश्मीर फाइल्स'चा दुसरा ट्रेलर आऊट


बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची दुसरी झलक खूपच दमदार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या


Upcoming Historical Movies : 'पावनखिंड'नंतर 'हे' ऐतिहासिक सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार; ‘शर्माजी नमकीन’ची रिलीज डेट जाहीर


आदित्य नारायणने सोशल मीडियावर शेअर केले मुलीचे नाव, चाहत्यांनी फोटो शेअर करण्याबाबत विचारताच म्हणाला...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha