Election Results 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. सर्वांना आता निकालाचे वेध लागले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले. उद्या (10 मार्चला) पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय पक्षांचा फैसला उद्या होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, अशा स्थितीत पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी किंवा बहुमताचा आकडा किती आहे हे जाणून घेऊयात..


उद्या जाहीर जाहीर होणाऱ्या निकालांचा परिणाम 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही होणार आहे. उद्या सायंकाळपर्यंत या राज्यांची सत्ता कोणाकडे राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांनाचं या निकालाची उत्सुकता लागली आहे.


उत्तर प्रदेश
 
या पाच राज्यातील महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील. जो पक्ष 202 जागा जिंकेल तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.


पंजाब


निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये उर्वरित राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळाला. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. या 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. पंजाबमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 59 आहे. ज्या पक्षाला 59 जागा मिळतील तो पक्ष पंजाबमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.


उत्तराखंड


पंजाबप्रमाणेच उत्तराखंडमध्येही गेल्या वर्षी बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. सत्ताधारी पक्ष भाजपने गेल्या वर्षी तीन मुख्यमंत्री बदलले. येथे विधानसभेच्या 70 जागा असून बहुमताचा जादुई आकडा 36 आहे. उत्तराखंमध्ये देखील 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.


गोवा


छोटे राज्य असूनही गोव्याची निवडणूक समीकरणे खूपच रंजक बनली आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेक मोठे राजकीय चढउतार येथे पाहायला मिळाले. राज्यात विधानसभेच्या 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागांची गरज आहे. 40 जागांसाठी गोव्यात एकाच टप्प्यात मतदान झाले आहे.


मणिपूर


मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा असून येथे बहुमतासाठी 31 जागा जिंकणे आवश्यक आहे. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकून भाजपने NPF,NPP आणि LJP सोबत आघाडी करुन  सरकार स्थापन केले होते. मणिपूरच्या 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते.


महत्त्वाच्या बातम्या: