एक्स्प्लोर

UP Result : उत्तर प्रदेशात योगी मॅजिक, सपाची तोकडी फाईट, काँग्रेस, बसपाचा सूपडा साफ

UP Election Result 2022 : योगींच्या मॅजिकपुढे विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि बसपाचा सूपडा साप झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही.

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचा जादू पुन्हा चालली आहे. योगींच्या मॅजिकपुढे विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि बसपाचा सूपडा साप झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने तोकडी फाईट दिली, पण भाजपला सत्तास्थापणेपासून राखू शकले नाहीत. 

सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 269 जागांवर दावा ठोकला आहे. 403 विधानसभा जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 202 जागांची गरज असते. भाजपने ही मॅजिक फिगर पार केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगींची जादू पुन्हा चालली आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला 129 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेस पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर बसपा फक्त एका जागेवर जिंकली आहे. तर जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली तरी 2017 च्या तुलनेत फटका बसला आहे. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 312 जांगावर विजय मिळवला होता. म्हणजेच यंदाच्या निवडणुकीत भाजपला 43 जागांचा तोटा झाला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक महत्वाची मानली जात आहे. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, असे म्हटले जाते. त्यामुळे भाजपने उत्तर प्रदेश जिंकून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपले मनोधेर्य नक्कीचे वाढवले असेल. 

योगींचा लाखांहून अधिक मतांनी विजय -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलाय. त्यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. याच मतदार संघातून लढणाऱ्या भीम आर्मीचे चंद्रशेखर यांचं डिपॉझिट जप्त झालाय. त्यांना केवळ 5 हजार 409 मत मिळाली आहेत.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष - 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकाल पाहता भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पक्षाच्या दणदणीत विजयानं उत्साहात असलेले कार्यकर्ते होळीपूर्वीच रंग आणि गुलालाची होळी खेळत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील भाजप कार्यालयाबाहेर आणि आजूबाजूला कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था - 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढली होती. काँग्रेसने सर्व 403 जागांवर आपले उमेदवार दिले होते. प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी 'लड़की हूं,लड़ सकती हूं' या घोषणासह महिलांना 40 टक्के जागा दिल्या होत्या. पण काँग्रेसला 2017 विधानसभा निवडणुकीपेक्षा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाला 403 जागांपैकी फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालावरुन उत्तर प्रदेशमधील जनतेने प्रियंका गांधी यांचे नेतृत्व नाकारल्याचे स्पष्ट दिसतेय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीद्वारे प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. पण प्रियंका गांधी यांची एन्ट्री सुपरफ्लॉप ठरल्याचे दिसतंय. 

यूपीत बसपाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला?
उत्तर प्रदेश निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 2007 मध्ये एक हाती सत्ता मिळवणारा बसपा पक्ष आता यूपीत फक्त 1 जागेवर सीमित झाला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 19 जागांवर यश मिळालं होतं. मात्र 2022 ची निवडणूक येता-येता पक्षात फक्त 3 आमदारच शिल्लक राहिले. यामधील काही आमदारांनी बसपाची साथ सोडत भाजप आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. तर काहींना स्वतः बसपा पक्ष प्रमुख मायावती यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बसला आपला 2017 चा आकडाही पुन्हा गाठता आला नाही आहे.  

आणखी वाचा : 

UP Election Result : नोएडामधून राजनाथ सिंह यांच्या मुलाचा 2.44 लाख मताधिक्याने विजय; अजित पवारांचा विक्रम मोडला

UP Election Result 2022: यूपीत योगींचा दबदबा, एक लाखांहून अधिक मतांनी विजयी; चंद्रशेखर आझाद यांचं डिपॉझिट जप्त

Up Election Result 2022: उत्तर प्रदेशात काँग्रेस-बसपा पुन्हा फेल, 2017 च्या तुलनेत या निवडणुकीत अशी होती कामगिरी

UP Election Result 2022 : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा विजय, लातूरमध्ये योगींची वेशभूषा घेत अवतरले बुलडोझर बाबा

UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था, प्रियंका गांधींची जादूही फिकी 

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget